स्टिव्ह स्मिथ-जॅक लीचचा हा खास फोटो होतोय जोरदार व्हायरल…

रविवारी(15 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 71 वी ऍशेस मालिका संपली. या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 135 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.

ही मालिका संपल्यानंतर मैदानावरील लढाई विसरुन दोन्ही संघांचे खेळाडू रविवारी द ओव्हल मैदानाच्या ड्रेसिंग रुममध्ये एकत्र आले होते. यावेळी खेळाडू एकमेकांशी संवाद साधताना बीअर पिण्याचा आनंद घेताना दिसून आले. याचा व्हिडिओ तसेच फोटो इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तसेच इंग्लंड क्रिकेटने ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा गोलंदाज जॅक लीचचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो सध्या प्रचंड चर्चेत आहे. तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये स्मिथ आणि लीच दोघांनीही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तसेच या दोघांनीही चश्मा घातलेला आहे. या फोटोला इंग्लंड क्रिकेटने गमतीशीर कॅप्शन दिले आहे की ‘सर्वकालिन दिग्गज आणि स्टिव्ह स्मिथ… स्मिथ शानदार ऍशेस मालिकेबद्दल अभिनंदन. लीचला चश्मा आवडतात.’

या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने 1 विकेटने विजय मिळवल्यानंतर लीच आणि त्याच्या चश्म्याची चर्चा झाली होती. या कसोटीत लीचने बेन स्टोक्सबरोबर शेवटच्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करताना इंग्लंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. यावेळी तो चश्मा घालून फलंदाजी करत होता.

तिसऱ्या सामन्यानंतर स्टोक्सने ऍशेस मालिकेचे प्रायोजक आणि चश्मा बनवणारी कंपनी स्पेकसेव्हरला ट्विट करुन लीचसाठी कायमस्वरुपी मोफत चश्मा देण्याची विनंती देखील केली होती.

त्यानंतर चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि ऍशेस मालिकेत त्यांचा पराभव होणार नाही हे पक्के केले. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या सेलिब्रेशन दरम्यान स्मिथने चश्मा लावल्याचे दिसून आले होते. त्यावेळी स्मिथने लीचचे अनुकरण केल्याचे म्हटले गेले होते.

पण आता ही ऍशेस मालिका संपल्यानंतर स्मिथ आणि लीचने एकत्र फोटो काढला असल्याने हा फोटो व्हायरल होत आहे. तसेच डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार स्मिथने चौथ्या सामन्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनमध्ये लीचचे अनुकरण केले नव्हते, असे स्वत: स्मिथने लीचला जाऊन सांगितले. याचा खूलासा लीचने केला आहे.

ही ऍशेस मालिका स्मिथसाठी खास ठरली. त्याने या मालिकेत 7 डावात 110.57 च्या सरासरीने 774 धावा केल्या आहेत.

स्टिव्ह स्मिथ आणि जॅक लीचच्या फोटोवर ट्विटरवर आलेल्या या काही प्रतिक्रिया- 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ कोण आहे सर्वोत्तम? सौरव गांगुली दिले ‘हे’ उत्तर

व्हिडिओ: सुरुवातीला खिल्ली उडवलेल्या स्मिथचे चाहत्यांकडून शेवटच्या कसोटीत झाले ‘असे’ कौतुक

प्रो कबड्डीत नीरज कुमारने केली ‘या’ मोठ्या विश्वविक्रमाची बरोबरी

You might also like

Leave A Reply