व्हिडिओ: सुरुवातीला खिल्ली उडवलेल्या स्मिथचे चाहत्यांकडून शेवटच्या कसोटीत झाले ‘असे’ कौतुक

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथवर मागीलवर्षी मार्चमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाडप्रकरणी 1 वर्षांची बंदी घातली होती. या बंदीचा कालावधी पूर्ण करत त्याने इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर ऍशेस मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

हे पूनरागमन करताना त्याची चेंडू छेडछाड प्रकरणामुळे प्रेक्षकांकडून खिल्ली उडवली गेली. पण त्यानेही हार न मानता ऍशेस मालिकेतून कसोटीत दमदार पुनरागमन करत त्याच्या शानदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली.

रविवारी 71 वी ऍशेस मालिका संपली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. ही मालिका स्मिथसाठी खास ठरली. त्याने या मालिकेत 2 शतके, 1 द्विशतक आणि 3 अर्धशतकांसह 110.57 च्या सरासरीने 774 धावा केल्या.

विशेष म्हणजे स्मिथची 2019 विश्वचषकापासून चेंडू छेडछाड प्रकरणामुळे प्रेक्षकांकडून खिल्ली उडवली जात होती. पण त्याने ऍशेस मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीमुळे तो जेव्हा शेवटच्या ऍशेस कसोटीत दुसऱ्या डावात 23 धावांवर बाद झाला, त्यावेळी तो ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना त्याचे प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत कौतुक केले.

प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या या कौतुकाबद्दल स्मिथनेही म्हटले त्याच्यासाठी पाचव्या कसोटीदरम्यान प्रेक्षकांकडून आलेली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha अ सा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

तब्बल ८६७ षटकानंतर इंग्लंडच्या या गोलंदाजाने टाकला पहिला नो बॉल!

जाणून घ्या, ऍशेस मालिका ड्रॉ झाली तरी ऑस्ट्रेलियाला का मिळाली ट्रॉफी?

भारत, ऑस्ट्रेलिया संघांनाही जमला नाही तो विश्वविक्रम केला अफगाणिस्तान संघाने!

You might also like

Leave A Reply