तब्बल ८६७ षटकानंतर इंग्लंडच्या या गोलंदाजाने टाकला पहिला नो बॉल!

लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात शेवटच्या डावात ऑस्ट्रेलिया विजयासाठी 399 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला नो बॉल टाकला.

त्याने या डावातील 31 व्या षटकाचा दुसरा चेंडू नो बॉल टाकला. हा चेंडू टाकताना त्याचा पाय क्रिजलाइनच्या बाहेर पडला.

विशेष म्हणजे या चेंडूवर फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिशेल मार्शने फटका मारण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवर स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या रॉरी बर्न्सने झेलही घेतला. त्यामुळे वोक्सने विकेट मिळाल्याचे सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली.

पण पंचांनी नो बॉलची शंका आल्याने लगेचच हा चेंडू टाकताना वोक्सच्या पाय कुठे पडला, हे तपासले. यामध्ये त्याने नो बॉल टाकल्याचे लक्षात आले त्यामुळे मार्शला जीवदान मिळाला.

30 वर्षीय वोक्स आत्तापर्यंत 31 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने पहिल्यांदाच नो बॉल टाकला आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत जवळजवळ 867 षटकानंतर म्हणजेच 5200 चेंडूंनंतर पहिल्यांदा नो बॉल टाकला आहे.

वोक्सला या डावात मात्र एकही विकेट मिळाली नाही. पण त्याने या सामन्यात पहिल्या डावात एक विकेट घेतली होती. त्याने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथची विकेट घेतली होती.

या सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव रविवारी 329 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावात घेतलेल्या 69 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 77 षटकात सर्वबाद 263 धावाच करता आल्या.

तत्पूर्वी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 294 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 225 धावां करता आल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha अ सा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या, ऍशेस मालिका ड्रॉ झाली तरी ऑस्ट्रेलियाला का मिळाली ट्रॉफी?

भारत, ऑस्ट्रेलिया संघांनाही जमला नाही तो विश्वविक्रम केला अफगाणिस्तान संघाने!

रवी शास्त्री म्हणतात, स्वत:लाच नाही तर संघालाही निराश करत आहे हा खेळाडू…

You might also like

Leave A Reply