विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ कोण आहे सर्वोत्तम? सौरव गांगुली दिले ‘हे’ उत्तर

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने 1 वर्षांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले आहे. त्याने नुकत्याच झालेल्या ऍशेस कसोटी मालिकेत 7 डावात 110.57 च्या सरासरीने 774 धावा केल्या आहेत.

त्याच्या या पुनरागमनानंतर पुन्हा एकदा त्याच्या आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या तुलनेची चर्चा सुरु झाली आहे. याबद्दल अनेक दिग्गजांनी याआधीही मते मांडली आहेत. पण भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे तो विराट आणि स्मिथची तुलना करु इच्छित नाही.

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार कोलकतामध्ये एका कार्यक्रमादरम्यान गांगुली म्हणाला, ‘हे असे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर दिले जाऊ शकत नाही. हे सर्व कामगिरीबद्दल आहे. विराट सध्या जगातील सर्वोत्तम आहे. म्हणून आपल्याला आनंद होतो.’

तसेच गांगुलीला स्मिथबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, ‘स्मिथचे विक्रमच सर्वकाही सांगून जातात. 26 कसोटी शतके करणे हा मोठा विक्रम आहे.’

सध्या कसोटी क्रमवारीत स्मिथ अव्वल क्रमांकावर, तर विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच वनडे क्रमवारीत विराट अव्वल क्रमांकावर आहे. तसेच स्मिथ 28 व्या क्रमांकावर आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

व्हिडिओ: सुरुवातीला खिल्ली उडवलेल्या स्मिथचे चाहत्यांकडून शेवटच्या कसोटीत झाले ‘असे’ कौतुक

प्रो कबड्डीत नीरज कुमारने केली ‘या’ मोठ्या विश्वविक्रमाची बरोबरी

तब्बल ८६७ षटकानंतर इंग्लंडच्या या गोलंदाजाने टाकला पहिला नो बॉल!

You might also like

Leave A Reply