रोहित शर्माने कसोटीत ओपनिंग करण्यावर या माजी क्रिकेटपटूने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी काहीदिवसांपूर्वी भारतीय संघाची निवड करण्यात आली. या संघात निवड समीतीने रोहित शर्माला सलामीवीर फलंदाज म्हणून पसंती दिली आहे.

त्यामुळे काही दिग्गजांनी निवड समीतीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज नयन मोंगिया यांनी रोहितच्या कसोटीत सलामीला फलंदाजी करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना मोंगिया म्हणाले, ‘सलामीला फलंदाजी करणे हे विशेषज्ञाचे काम आहे, जसे की यष्टीरक्षण. तो(रोहित) मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करतो. पण कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना मानसिकतेमध्ये बदल करण्याची अवश्यकता असते.’

‘जर तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये जसे चेंडूवर आक्रमण करतो, तेच करण्यावर टिकून राहिला तर ती वेगळी गोष्ट आहे. त्याने कसोटी क्रिकेटप्रमाणे त्याचा खेळ बदलण्यापेक्षा त्याच्या ताकदीवर टिकून राहिले पाहिजे. जर त्याने तसे केले तर त्याच्या मर्यादीत षटकांच्या खेळावर परिणाम होईल.’

तसेच मोंगिया यांनी अन्य फलंदाजांना संधी का दिली जात नाही असा प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की ‘ज्यांनी एका मोसमात 800-1000 धावा केल्या आहेत त्यांना सलमावीर म्हणून का संधी दिली जात नाही.’

‘प्रियांक पांचाल आणि अभिमन्यू इश्वरन सारख्या क्रिकेटपटूंची देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरासरी 50-60 अशी असताना त्यांना संधी नाही. त्यांना संधी कधी मिळणार. त्यांच्यासाठी ही निराशा करणारी गोष्ट आहे.’

रोहितने आत्तापर्यंत 27 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 39.62 च्या सरासरीने 1585 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच रोहितने वनडेमध्ये 134 सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे. यात त्याने 57.42 च्या सरासरीने 6719 धावा केल्या आत. यामध्ये त्याच्या 25 शतकांचा आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्टिव्ह स्मिथ-जॅक लीचचा हा खास फोटो होतोय जोरदार व्हायरल…

विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ कोण आहे सर्वोत्तम? सौरव गांगुली दिले ‘हे’ उत्तर

व्हिडिओ: सुरुवातीला खिल्ली उडवलेल्या स्मिथचे चाहत्यांकडून शेवटच्या कसोटीत झाले ‘असे’ कौतुक

You might also like

Leave A Reply