भारताच माजी क्रिकेटपटू डब्लू व्ही रमन यांची बंगाल क्रिकेट संघाने आगामी हंगामासाठी फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर बंगालचा माजी कर्णधार लक्ष्मी रतन शुक्ला यांना नवे प्रशिक्षक बनवले जाणार आहे. रमन यांना भारताच्या महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून मोठा अनुभव आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघ २०२० टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.
बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी (२५ जुलै) वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘लक्ष्मीरतन शुक्ला यांना मंगळवारी मुख्य प्रशिक्षक बनवले जाईल. ते आमचे २५ वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक आहेत. संघातील सर्व खेळाडूंशी शुक्ला यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शुक्ला बंगाल क्रिकेटसाठी नवीन कल्पना मांडतील अशी अपेक्षा आहे.’
अरुण लाल यांनी अलीकडेच बंगाल क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. अरुण लाल यांच्या मार्गदर्शनाखाली बंगालने यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र, त्यांना मध्य प्रदेशकडून पराभव पत्करावा लागला होता. अरुण लाल यांच्या राजीनाम्याची माहिती कोणत्याही खेळाडूला दिली गेली नव्हती.
अरुण लाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यामागे थकवा आणि वय हे कारण सांगितले होते. मध्य प्रदेशच्या हातून उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर लाल यांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलेले. याच कारणाने अरुण लाल राजीनामा देतील यावर खेळाडूंचा विश्वास बसत नव्हता. यासोबतच संघाचा माजी कर्णधार व अनुभवी भारतीय खेळाडू वृद्धिमान साहा याने देखील बंगालची साथ सोडली आहे. पुढील हंगामापासून तो त्रिपुरा संघासाठी खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरबद्दल ‘ती’ कमेंट करणे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूच्या अंगाशी, सारखा वाजतोय फोन!
ब्रेकिंग! भारताच्या सुवर्ण आशांना सुरुंग! ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची कॉमनवेल्थमधून माघार
‘त्यावेळी मी कारगिल युद्ध लढायला निघालेलो’, शोएब अख्तरने केले बेताल विधान