---Advertisement---

वनिंदू हसरंगाचा नाद खुळा विक्रम! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा बेंगलोरचा दुसरा ‘रॉयल’ खेळाडू

Wanindu-Hasaranga
---Advertisement---

रविवारी (८ मे) खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या डबल हेडरचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. हा सामना आरसीबीने तब्बल ६७ धावांनी नावावर केला. आधी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत आरसीबीच्या खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन केले. यादरम्यान त्यांचा फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगाने संघासाठी आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन करून दाखवले.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि इतर खेळाडूंच्या महत्वाच्या योगदानामुळे संघाने १९२ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघ अवघ्या १२५ धावा करून सर्वबाद झाला. परिणामी आरसीबीने मोठ्या अंतराने हा सामना जिंकला. या विजयानंतर आरसीबी १२ गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) या सामन्यात टाकलेल्या ४ षटकात १८ धावा खर्च केल्या आणि ५ विकेट्स नावावर केल्या. आरसीबीच्या इतिहासातील ही एखाद्या गोलंदाजाने केलेली दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. माजी दिग्गज अनिल कुंबळेने आयपीएल २००९मध्ये आरसाबीसाठी सर्वोत्तम कामगिरी केली होती. कुंबळेने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ५ धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या होत्या. आता हसरंगा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

यादीत तिसऱ्या क्रमांकावर जयदेव उनाडकट आहे, ज्याने २०१३ हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २५ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर हर्षल पटेल आहे. हर्षलने आयपीएल २०२१ म्हणजेच मागच्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध २७ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या होत्या. शेवटच्या क्रमांकावर सॅम्युअल बद्री आहे, ज्याने आरसीबीसाठी २०१७ हंगामात ९ धावा खर्च करून मुंबई इंडियन्सच्या ४ विकेट्स घेतल्या होत्या.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारे खेळाडू
५/५ अनिल कुंबळे विरुद्ध राजस्थान रॉयल्स (आयपीएल २००९)
५/१८ वनिंदू हसरंगा विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (आयपीएल २०२२)*
५/२५ जयदेव उनाडकट विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (आयपीएल २०१३)
५/२७ हर्षल पटेल विरुद्ध मुंबई इंडियन्स (आयपीएल २०२१)
४/९ सॅम्युअल बद्री विरुद्ध मुंबई इंडियन्स (आयपीएल २०१७)

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘कशाचा रनमशीन, हा तर डकमशीन’, पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विराटची खरडपट्टी

‘इशान- सॅमसन नकोच, टी२० विश्वचषकात फिनिशर म्हणून तोच हवा’, कार्तिकच्या सलग ३ सिक्सनंतर नेटकऱ्यांची मागणी

हसरंगाने काढला हैदराबादचा घाम, ६७ धावांनी विजय मिळवत बेंगलोरने गुणतालिकेतील स्थान केले बळकट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---