वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. साखळी फेरी संपल्यानंतर आता उपांत्य फेरी व अंतिम सामना होईल. पहिली उपांत्य लढत ही भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणार आहे. तर, दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका भेटणार आहेत. तत्पूर्वी साखळी फेरीच्या झालेल्या सामन्यांमध्ये अनेक क्षेत्ररक्षकांनी मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत आपल्या संघाला मदत केली. अशाच टॉप पाच क्षेत्ररक्षकांविषयी आपण जाणून घेऊया.
मार्नस लॅब्युशेन (ऑस्ट्रेलिया)- या संपूर्ण विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन हा आपल्या क्षेत्ररक्षणामुळे अनेकदा छाप पाडताना दिसून आला. त्याने अनेक धावा रोखत विरोधी फलंदाजांना मोकळ्या हाताने फटकेबाजी करण्यापासून रोखले. न्यूझीलंडविरुद्ध अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात त्याने अखेरच्या षटकात महत्त्वपूर्ण अशा चार धावा वाचवत एक धावबाद करत ऑस्ट्रेलियाला विजयी केले होते. तसेच, बांगलादेशविरुद्ध देखील त्याने अशाच प्रकारे क्षेत्ररक्षण केलेले.
WATCH: A contender for catch of the tournament from Mitchell Santner 😯#CWC23 | NZvAFGhttps://t.co/rzxCuaEPuc
— ICC (@ICC) October 18, 2023
मिचेल सॅंटनर (न्यूझीलंड)- सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांचा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंडच्या मिचेल सॅंटनरने पहिल्या सामन्यापासून क्षेत्ररक्षकात आपला दर्जा दाखवून दिला. या विश्वचषकातील सर्वोत्तम झेल ही त्याच्याच नावे आहेत. त्याने आत्तापर्यंत विश्वचषकात तब्बल 29 धावा वाचविल्या आहेत.
विराट कोहली (भारत)- भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली हा मैदानात नेहमीच आपल्या क्षेत्ररक्षकाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. यावेळी देखील त्यांनी तशीच कामगिरी करत भारतासाठी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक होण्याचा मान मिळवला.
डेव्हिड मिलर- दक्षिण आफ्रिका तसेच जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये समाविष्ट होणारा डेव्हिड मिलर या विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक धावा वाचवणारा क्षेत्ररक्षक ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत तब्बल 31 धावा वाचवून आपल्या संघाची मदत केली आहे. तसेच काही अवघड झेल टिपून त्याने गोलंदाजांना प्रोत्साहित देखील केले आहे.
रविंद्र जडेजा- भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा हा नेहमीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये सामील असतो. या विश्वचषकातही एक अपवाद वगळता त्याने आपली ही ओळख कायम ठेवली आहे. सीमारेषेवर तसेच 30 यार्डमध्येही त्याने अनेक धावा वाचवलेल्या आहेत.
(Best Fielders In ODI World Cup 2023 Labuchagne And Santner There)
महत्वाच्या बातम्या –
मायदेशी परतताच पाकिस्तान संघाला जोरदार धक्का! वर्ल्डकपमधील सुमार कामगिरीनंतर आला पहिला राजीनामा
गुरबाजने केलेली अहमदाबादच्या गरीब लोकांची मदत; पाहून शशी थरूरही म्हणाले, ‘हृदयासारखं तुझं करिअरही…’