---Advertisement---

टी२० क्रमवारीत भुवनेश्वरला जबरदस्त फायदा, श्रीलंकेविरुद्ध घेतल्या होत्या सर्वाधिक विकेट्स

On: गुरूवार, ऑगस्ट 5, 2021 6:02 PM
Bhuvneshwar-Kumar-Shikhar-Dhawan
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु याच संघातील खेळाडू मिचेल मार्शला नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या टी-२० क्रमवारीमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. तसेच भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही मोठी भरारी घेतली आहे.

मिचेल मार्श आणि नईम यांना फायदा
ऑस्ट्रेलियन संघाचा खेळाडू मिचेल मार्श याने बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ४५ धावांची खेळी केली होती. तर बांगलादेश संघाचा खेळाडू नईम याने ३० धावांची खेळी केली होती. ज्याचा फायदा त्यांना नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आयसीसी क्रमवारीत झाला आहे. दोघेही आयसीसी टी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या २५ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

भुवनेश्वर कुमारची लांब उडी
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या गोलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत भुवनेश्वर कुमारला जबरदस्त फायदा झाला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी पार पाडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. ३ टी-२० सामन्यात त्याने ५ विकेट्सची कामगिरी केली होती. याचेच फळ मिळत त्याने ४ स्थानांची उडी घेत आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या यादीत १२ वे स्थान गाठले आहे.

तसेच वेस्ट इंडीजचा फिरकीपटू हेडन वॉल्श याला याने देखील ४ क्रमांकानी उडी घेत ३४ वे स्थान गाठले आहे. तर बांगलादेश संघाचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने ४६ व्या स्थानावरून ३० व्या स्थानावर उडी मारली आहे. (Bhuvaneshwar kumar gains four places in icc men’s T20 ranking)

तसेच बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आयसीसी फलंदाजांच्या यादीत ५६ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर तर गोलंदाजांच्या यादीत त्याला ३ स्थानांचा फायदा झाला आहे. तो या यादीत १८ व्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अफगाणिस्तान संघाचा मोहम्मद नबी पहिल्या तर शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

थोडीशी मजामस्ती! जेव्हा पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये झाली ख्रिस गेलची एन्ट्री, रंगला हास्यकल्लोळ

आयपीएलपूर्वी न्यूझीलंडचा संघ करणार बांगलादेश दौरा, असे आहे पूर्ण वेळापत्रक

रिषभच्या त्या कृत्याला पाहून चाहत्यांना आली धोनीची आठवण; म्हणाले, ‘हळू हळू शिकतोय’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---