---Advertisement---

युझवेंद्रच्या ‘चहल टिव्ही’वर पाहुणा म्हणून भुवीला आमंत्रण, पण ‘या’ कारणामुळे चिडला अनुभवी गोलंदाज

---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या ३ सामन्याच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. ही मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला होता. तसेच सामना झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने एक खुलासा केला आहे.

भारतीय संघाला पहिला टी-२० सामन्यात विजय मिळवून देण्यात भुवनेश्वर कुमारने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने श्रीलंका संघातील ४ फलंदाजांना माघारी धाडले होते. तसेच हा सामना झाल्यानंतर त्याने चहल टिव्हीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने चहलवर एका गोष्टीचा राग असल्याचा खुलासा केला आहे. खूप वेळ सुरू असलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान चहलने भुवनेश्वर कुमारची पायखेची करत म्हटले की, “भुवनेश्वर कुमारने ७० वर्षानंतर पुनरागमन केले. परंतु कधी चहल टिव्हीला मुलाखत दिली नाही.”

यावर प्रतिक्रीया देत भुवनेश्वर कुमारने म्हटले की, “कारण चहल टीव्हीवर मला कधी आमंत्रण दिले गेलेच नाही.” (Bhuvaneshwar kumar revealed why he is angry with yuzvendra chahal)

https://twitter.com/BCCI/status/1419507773151322117?s=20

भुवनेश्वर कुमारचा ‘चौकार’
श्रीलंका संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या टी -२० सामन्यात भुवनेश्वर कुमार आपल्या जुन्या फॉर्ममध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ३.३ षटक गोलंदाजी करत अवघ्या २२ धावा खर्च केल्या. या दरम्यान त्याने ४ फलंदाजांना माघारी धाडले.

भारतीय संघाचा जोरदार विजय
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १६४ धावा केल्या होत्या.यामध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५० आणि कर्णधार शिखर धवनने ४६ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून चरिथ असलंकाने ४४ आणि अविष्का फर्नांडोने २६ धावांची खेळी केली. श्रीलंका संघाचा डाव १८.३ षटकात संपुष्टात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला. तसेच ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

याद आ रही है! जड्डूला येतेय लाडक्या पत्नीची आठवण; सोशल मीडियावर व्यक्त केले दु:ख

‘क्यूटेस्ट रेनबो’; रिषभ पंतच्या ‘या’ गोष्टीवर गर्लफ्रेंडचं आलं मन, दिली प्रेमळ प्रतिक्रिया

“हसरंगा आयपीएलमध्ये खेळताना दिसेल”, दिग्गजाने व्यक्त केला आशावाद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---