---Advertisement---

धक्कादायक! भारताच्या अव्वल गोलंदाजांच्या वडिलांचे निधन, यकृताच्या कर्करोगाने होते त्रस्त

On: गुरूवार, मे 20, 2021 7:27 PM
---Advertisement---

मागील काही काळापासून भारतीय क्रिकेटपटूंच्या कुटुंबातील सदस्यांच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये आणखी एक भर पडली असून, गेल्या एक वर्षाहून अधिक काळ यकृत कर्करोगावर उपचार घेत असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमार याचे वडील किरणपाल यांचे गुरुवारी (२० मे) मेरठ येथील गंगानगर येथे निधन झाले. किरणपाल यांच्यावर त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मूळ गावी नेण्यात येईल पार्थिव
वडिलांच्या निधनानंतर भुवनेश्वर आपल्या कुटुंबासह मूळ गाव असलेल्या लुहारली बुलंदशहर येथे रवाना झाला आहे. भुवनेश्वरसह त्याची बहीण रेखा आणि आई इंद्रेश उपस्थित आहेत. अंत्यसंस्कार लुहारलीमध्येच होणार आहेत. किरणपाल हे ६३ वर्षांचे होते. बुधवारी त्यांनी खाणेपिणे सोडले. तीन दिवसांपूर्वी व्हॅलेंटीस हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरी परतले होते. तरीदेखील त्यांच्या यकृतामध्ये समस्या होती. ७ मे रोजी त्यांना गंगानगरमधील दिव्य ज्योति नर्सिंग होममध्ये दाखल केले. त्यानंतर मसूरीच्या व्हॅलेंटीस रूग्णालयात त्यांच्यावर उपचार केले गेले. किरणपाल यांच्यावर यापूर्वी दिल्लीमध्ये उपचार केले जात होते.

भुवनेश्वरला पुरस्कार मिळाल्यावर दिली होती प्रतिक्रिया
भुवनेश्वरला मार्च महिन्यात आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार मिळाल्यानंतर किरणपाल यांनी आनंद व्यक्त करत म्हटले होते की, “अल्पावधीत आयसीसीकडून एकापेक्षा जास्त पुरस्कार मिळणे म्हणजे भुवनेश्वरची प्रतिभा आणि समर्पण प्रतिबिंबित होते. देव त्याची कौशल्ये आणि खेळण्याची क्षमता नेहमीच जपेल.” किरणपाल हे नेहमी भुवनेश्वरला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात येऊन सामने पाहताना दिसायचे.

मागील काळात या खेळाडूंनी गमावले कुटुंबिय
सध्या भारतात सुरू असलेल्या कोरोना या साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेत काही क्रिकेटपटूंना आपल्या नातलगांना गमवावे लागले. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग तसेच, भारताच्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य लेगस्पिनर पियुष चावला या दोघांच्याही वडिलांचे या आजारात निधन झाले. भारतीय महिला संघाची आक्रमक फलंदाज वेदा कृष्णमूर्ती हिला देखील आपली आई व बहीण या आजारामुळे गमवावी लागली. तसेच युवा महिला यष्टीरक्षक प्रिया पुनिया हिच्यादेखील आईचे या आजारात निधन झाले.

महत्त्वाच्या बातम्या-

आधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत अडवला चेंडू, नंतर स्वत:च फेकला सीमारेषेबाहेर! पाहा विनोदी व्हिडिओ

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकत हे भारतीय खेळाडू ठरले आहेत सिक्सर किंग

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर करुनही पुनरागमन करणारे ८ खेळाडू, ३ आहेत पाकिस्तानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---