---Advertisement---

‘सत्तर वर्षांनंतर पुनरागमन करतोय’ म्हणत चहलकडून भुवीची थट्टा, मग काय चिडला सिनीयर गोलंदाज

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने आपल्या गोलनंदाजाने लाखो क्रिकेट प्रेमींच्या मनात स्थान निर्माण केले आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारतीय क्रिकेट संघ कमालीची कामगिरी श्रीलंकेच्या भूमीवर बजावत असताना संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रविवारी (२५ जुलै) झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भुवनेश्वर याची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. श्रीलंका संघाच्या चार विकेट घेत भुवनेश्वरने श्रीलंका संघाला हतबल केले. सामन्यानंतर त्याने पत्रकार परिषदेत बोलताना संघातील फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याच्यावर असलेल्या आपल्या नाराजीचा खुलासा केला आहे. त्याने अचानक चहलशी नाराजी व्यक्त केल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या असाव्यात.

संघ म्हणून एकत्र खेळत असताना खेळाडूंचा आपापसांत एक ऋणानुबंध तयार होत असतो. यातूनच त्यांच्यात खेळीमेळीचे वातावरण निर्माण होत असते. तरीही भुवनेश्वर चहलवर कशामुळे नाराज झाला असावा?, चला जाणून घेऊया.

बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला असून त्या व्हिडिओमध्ये चहलने बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यात चहलने भुवनेश्वर याच्यावर एक टिप्पणी केली आहे. “भुवनेश्वर कुमार ७० वर्षांनंतर पुन्हा संघात दाखल झाला आहे,” असं चहल म्हणाला. चहलने केलेले हे वक्तव्य भुवनेश्वरच्या चांगलेच मनाला लागले आहे. यावर त्याने प्रतिक्रिया देत, “कारण चहल टीव्हीवर मला कधी आमंत्रण दिले गेलेच नाही,” असे म्हटले आहे.

रविवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार आपल्या जुन्या शैलीत दिसून आला. भुवनेश्वरला ३.३ षटकांमध्ये २२ धावा देऊन ४ विकेट घेण्यात यश मिळाले. संघाच्या कठीण क्षणी भुवनेश्वरने उत्तम कामगिरी बजावली आणि रविवारचा सामना जिकवण्यात भुवनेश्वरचा सिंहाचा वाटा राहिला.

महत्त्वाच्या बातम्या-

पृथ्वी शॉच्या इंग्लंडला जाण्याने ‘या’ दोघांवर वाढला दबाव, चांगली कामगिरी करण्याचे असेल आव्हान

‘आर्किटेक्ट म्हणून फॉर्मल शर्ट ते भारताची जर्सी, खास प्रवास होता’, पदार्पणानंतर वरुण चक्रवर्तीचे भावनिक ट्विट

पोलार्ड-गेलसारखे धुरंधर असूनही २६ वर्षांपासून वनडे मालिकेत विंडीज कांगारूंकडून खातोय सपाटून मार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---