---Advertisement---

‘आर्किटेक्ट म्हणून फॉर्मल शर्ट ते भारताची जर्सी, खास प्रवास होता’, पदार्पणानंतर वरुण चक्रवर्तीचे भावनिक ट्विट

---Advertisement---

भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सामन्यांसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण या दौऱ्यातून वनडे आणि टी२० पदार्पण करताना दिसले. यात युवा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचाही समावेश आहे. त्याने रविवारी (२५ जुलै) झालेल्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याबद्दल आता त्याने भावनिक ट्विट केले आहे.

वरुणने सोमवारी (२६ जुलै) ट्विट केले की ‘आर्किटेक्ट म्हणून फॉर्मल शर्ट घालते ते भारतीय संघाची जर्सी घालण्यापर्यंतचा प्रवास खास होता. काही चढ आणि अनेक उतार होते, पण गंतव्यापेक्षा प्रवास जास्त सुंदर आहे. निकालांकडे दुर्लक्ष करुन पुढे जात राहिल. सर्वांचे धन्यवाद. प्रवास पुढेही चालू राहिल.’

https://twitter.com/chakaravarthy29/status/1419701135099633681

२९ वर्षीय वरुणचा क्रिकेटमधील प्रवास खूप वेगळा होता. त्याने केवळ १७ वर्षांच्या वयात दोन वेळा दुखापतींमुळे क्रिकेट खेळणे सोडले होते. बारावी पास केल्यानंतर त्याने ५ वर्षे चेन्नईमध्ये आर्किटेक्टचे शिक्षण घेतले. यानंतर त्याने नोकरीही केली. परंतु, तिथे त्याचे मन लागले नाही. यानंतर त्याने वयाच्या २६ व्या वर्षी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले.

पुन्हा क्रिकेटमध्ये आल्यानंतर त्याने आयपीएल गाजवण्यास सुरुवात केली. साल २०१९ मध्ये आयपीएल फ्रँचायझी किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ८ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केले होते. त्यानंतर २०२० आयपीएलसाठी झालेल्या लिलावात त्याला कोलकाता नाईट रायडर्सने ४ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले. त्यामुळे गेले २ वर्षे तो कोलकाताकडून खेळत आहे.

आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे अखेर वरुणची भारतीय संघातही वर्णी लागली. विशेष म्हणजे मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी त्याची ऑस्ट्रेलियाच्या २०२०-२१ च्या दौऱ्यासाठीही निवड झाली होती. मात्र, त्याला दुखापतीमुळे त्या दौऱ्यावर जाता आले नाही. नंतरही फिटनेसमुळे त्याला भारताच्या संघात स्थान मिळाले नाही. मात्र, अखेर श्रीलंका दौऱ्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले.

वरुणची कारकिर्द 
वरुणने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये १ प्रथम श्रेणी सामना, ९ अ दर्जाचे सामने आणि २२ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १ विकेट घेतली आहे. यासोबतच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने १६.६८ च्या सरासरीने २२ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२० मध्ये त्याने २४.५३ च्या सरासरीने २६ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

पोलार्ड-गेलसारखे धुरंधर असूनही २६ वर्षांपासून वनडे मालिकेत विंडीज कांगारूंकडून खातोय सपाटून मार

डॉमिनोजने दिलेला शब्द पाळला! मिराबाई चानूच्या घरी पाठवला पिझ्झा; वेटलिफ्टरनं ट्वीट करत दिला धन्यवाद

कसोटीतून डच्चू मिळाल्यानंतर राहुलच्या १२ डावात फक्त १९५ धावा, सांगितले कशी केली उणिवांवर मात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---