---Advertisement---

भारताने सामना गमावला, पण भुवनेश्वरला ४ विकेट्सने मोठा फायदा, महत्वाच्या यादीत अश्विनला टाकले मागे

On: रविवार, जून 12, 2022 11:16 PM
Bhuvneshwar-Kumar
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेचा दुसरा सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ४ विकेट्सने जिंकला. या स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजीसाठी पोषक होती. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तसेच, दक्षिण आफ्रिका संघानेही सुरुवातीच्या विकेट्स झटपट गमावल्या. भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहलने आफ्रिकी संघाच्या सुरुवातीच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले.

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर रविचंद्रन अश्विन होता. भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) याच्यापूर्वी चौथ्या क्रमांकावर होता, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने स्वतःच्या आकड्यांमध्ये सुधारणा केली. या यादीत रवींद्र जडेजा मात्र त्याच्या जागेवर कामय आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चमकदार कामगिरी केली. पॉवरप्लेमधील तीन षटके भुवनेश्वरने टाकली आणि या तीन षटकांमध्ये प्रत्येकी एक-एक म्हणजेच तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या, तर १८व्या षटकात देखील त्याने एक विकेट घेतली. या चार विकेट्सनंतर भुवनेश्वर कुमारने टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत रविचंद्रन अश्विनला पछाडले.

अश्विनच्या टी-२० क्रिकेटमध्ये ६१ विकेट्स आहेत, तर भुवनेश्वरच्या ६३ विकेट्स झाल्या आहेत. दुसरीकडे चहलने या सामन्यात एक विकेट घेताच जसप्रीत बुमराह आणि त्याच्यातील विकेट्सचे अंतर पूर्वीपेक्षा वाढले. आता चहलच्या ६९, तर बुमराहच्या ६७ टी-२० विकेट्स झाल्या.

भारतासाठी सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणारे गोलंदाज 
६९* – युझवेंद्र चहल
६७ – जसप्रीत बुमराह
६३ – भुवनेश्वर कुमार*
६१ – रविचंद्रन अश्विन
४८ – रवींद्र जडेजा

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १४८ धावा केल्या. यामध्ये श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४० धावा केल्या. ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी एक आकडी धावसंख्येवर विकेट्स गमावल्या. एन्रीच नॉर्कियाने ३६ धावा खर्च करून दक्षिण आफ्रिकी संघासाठी सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

WIPL। ‘मला मुंबई इंडियन्ससाठी खेळायला आवडेल’, टीम इंडियाच्या महिला खेळाडूची मोठी प्रतिक्रिया

‘कर्णधारपद सोड आणि…’, न्यूझीलंडच्याच माजी खेळाडूचा विलियम्सनला खोचक सल्ला

आधी पोटोबा, मग विठोबा! ENGvsNZ संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टँन्ड्समध्येच झोपला चाहता, Video पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---