ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगचा दहावा हंगाम १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी, सर्व संघांनी आपापल्या संघांची बांधणी करायला सुरुवात केली आहे. गेल्या हंगामातील उपविजेत्या मेलबर्न स्टार्सने आगामी हंगामासाठी अफगाणिस्तानचा चायनामन फिरकी गोलंदाज झहीर खान पख्तीन याला करारबद्ध केले आहे. २१ वर्षीय झहीर संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल.
मॅक्सवेलच्या नेतृत्वात खेळणार झहीर
मेलबर्न स्टार्स व्यवस्थापनाने अधिकृतपणे झहीरसोबत करार केल्याचे जाहीर केले आहे. करारबद्ध झाल्यानंतर झहीरने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, “बीबीएलच्या आगामी हंगामात खेळण्यासाठी मी सज्ज आहे. गतउपविजेता मेलबर्नचा संघ चांगलाच मजबूत भासतोय. मला संधी दिल्याबद्दल क्लबचे आभार. येणारा हंगाम आमच्यासाठी नक्कीच लाभदायी ठरेल.”
झहीर मागील हंगामात ब्रिस्बेन हिट संघाचे प्रतिनिधित्व करत होता. मेलबर्न स्टार्स संघात झहीरशिवाय इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो व वेस्ट इंडीजचा निकोलस पूरन हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. ग्लेन मॅक्सवेल कर्णधार असलेल्या संघात, ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघातील मार्कस स्टॉयनिस, ऍडम झंपा व नॅथन कुल्टर-नाईल या खेळाडूंचा मेलबर्न संघात समावेश आहे.
🚨 International @BBL Signing!
We've secured Afghanistan spinner Zahir Khan for #BBL10! 🇦🇫 #TeamGreen 💚
— Melbourne Stars (@StarsBBL) November 17, 2020
डेविड हसीने केले स्वागत
मेलबर्न स्टार्सचा मुख्य प्रशिक्षक डेविड हसी याने झहीरच्या निवडी विषयी सांगितले, “आम्ही सर्वजण त्याच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. झहीरच्या येण्याने आमच्या फिरकी विभागाला चांगली बळकटी मिळाली आहे. झंपा, ओ कोनेल, हींचलीफ व कर्णधार ग्लेन मॅक्सवेल यांच्यासोबत तो फिरकीची जबाबदारी सांभाळेल. आशा करतो, या हंगामात आम्ही यशस्वी ठरू.”
बिग बॅश लीगचा आगामी हंगाम १० डिसेंबर पासून सुरू होत आहे. होबार्ट हरिकेन्स विरुद्ध सिडनी सिक्सर्स या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. मेलबर्न रेनीगेड्स बिग बॅश लीगचे गतविजेते आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ऍडलेडमध्ये कोविड-१९ ची दुसरी लाट; ‘या’ स्टेडियमवर हलवली जावू शकते भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी
बाबर आझम की विराट कोहली? पाकिस्तान सुपर लीगनंतर चाहत्यांनी केली तुलना
अरेरे..! कमीतकमी स्वतःच नाव तरी बदल; पाहा का झाला शोएब मलिक सोशल मीडियावर ट्रोल
ट्रेंडिंग लेख –
ऍडलेडमध्ये कोविड-१९ ची दुसरी लाट; ‘या’ स्टेडियमवर हलवली जावू शकते भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश