---Advertisement---

पंड्याबाबत धक्कादायक ब्रेकिंग! बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही? खुद्द बीसीसीआयने दिली माहिती

Hardik-Pandya
---Advertisement---

विश्वचषक 2023 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीचा बळी ठरला असून या दुखापतीमुळे तो आता न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी सामन्यातून बाहेर पडू शकतो. हार्दिक पंड्या धरमशाला येथे किवी संघाविरुद्धच्या सामन्यात भाग घेऊ शकणार नाही आणि ही संघासाठी चांगली बातमी म्हणता येणार नाही. पंड्याच्या दुखापतीविषयीची माहिती स्वत: बीसीसीआयने दिली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला दुखापत झाली होती. हार्दिक आपले पहिले षटक टाकत असताना चौकार अडवताना पाय घसरला आणि त्यामुळे त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. बांगलादेशच्या डावातील नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर लिटन दासने सरळ खेळलेला शॉट हार्दिकने उजव्या पायाने थांबवण्याचा प्रयत्न केला आणि याच दरम्यान त्याच्या घोट्याला मुरड आली आणि तो मैदानावर पडला. यावेळी फिजिओ मैदानात आले आणि त्याच्या पायाला टेप लावला. तसेच, काही उपचारही केले. मात्र, यानंतर पंड्याला मैदान सोडावे लागले आणि तेथून लगेच त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले.

बीसीसीआयने दिली माहिती
पंड्याला स्कॅनसाठी मुंबईच्या स्पेशालिस्ट डाॅक्टरकडे पाठवण्यात आले आहे. अशात आता बीसीसीआयनेच माहिती दिली आहे की, तो न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी धरमशाला येथे जाणार नाही. तो थेट लखनऊमध्ये इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात संघाशी जोडला जाईल.

https://twitter.com/BCCI/status/1715259643419828306

विश्वचषक 2023 मधील पंड्याची कामगिरी
या विश्वचषकात हार्दिक पंड्याची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. गोलंदाजीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक बळी आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी 2 बळी घेतले आहेत. तसेच, त्याला फक्त एकदाच फलंदाजीची संधी मिळाली, ज्यात त्याने 11 धावांची नाबाद खेळी केली आहे.

भारताचा पुढील सामना 22 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध धरमशाला येथे होणार आहे. विश्वचषकात भारताने आतापर्यंत 4 सामने खेळले असून चारही सामने भारताने जिंकले आहेत. यंदाचा विश्वचषक भारतात होत असल्याने भारताने हा विश्वचषक जिंकावा अशा चाहत्यांच्या अपेक्षा आहेत. (big blow Team India Hardik Pandya will be out of important match due to injury)

हेही वाचा-
विराटला करायचे नव्हते शतक, पण राहुलने कशी घातली समजूत? स्वत:च केलाय खुलासा, लगेच वाचा
CWC 2023: भारताच्या विजयानंतर Point Tableमध्ये मोठा उलटफेर, ‘या’ संघांच्या बदलल्या जागा; टाका नजर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---