इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील 52 वा सामना शनिवारी (31 ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होईल. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी हैदराबादला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. याआधी या संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे संघातून बाहेर गेला होता. त्यामुळे संघात योग्य संतुलन राखने अवघड झाले होते. यातच हैदराबादच्या अडचणींमध्ये पुन्हा भर पडली आहे. त्यांचा आणखीन एक खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे.
विजय शंकरला झाली होती दुखापत
अष्टपैलू विजय शंकर हैदराबाद संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. मागील काही सामन्यात केवळ गोलंदाजीतच नाही, तर फलंदाजीतही त्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे. परंतु दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात गोलंदाजी करताना त्याला हार्मस्ट्रिंगची दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता. मात्र, तो अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याला उर्वरित आयपीएलमधून बाहेर जावे लागले आहे.
वृद्धीमान साहा झाला होता जखमी
मागील सामन्यात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा सलामीला आला होता. त्याने 87 धावांची दमदार खेळी केली होती. मात्र दुखापतीमुळे तो देखील दुसऱ्या डावात मैदानात आला नव्हता. जर तो दुखापतीतून सावरला नसेल, तर जॉनी बेयरस्टोला संघात स्थान द्यावे लागेल. अशा परिस्थितीत संघांचे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. कारण जॉनी बेयरस्टो संघात आल्यामुळे अष्टपैलू जेसन होल्डरला संधी मिळणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ खेळाडू बनू शकतो तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू, गंभीरची भविष्यवाणी
कमाल लाजवाब राहूल! आयपीएलमध्ये अनोखी कामगिरी करत विराट कोहलीच्या विक्रमाची केली बरोबरी
राग भोवला! ख्रिस गेलला ‘त्या’ कृत्यामुळे सुनावण्यात आली शिक्षा
ट्रेंडिंग लेख –
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खेळीने एमएस धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला