---Advertisement---

हेडिंग्ले कसोटीत पुनरागमनाच्या इराद्याने उतरणार इंग्लंड, असा असेल फलंदाजी क्रम

On: गुरूवार, ऑगस्ट 19, 2021 3:28 PM
england-cricket-team
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गमावल्याने यजमान इंग्लंड मालिकेत १-० असा पिछाडीवर पडला आहे. इंग्लंडला मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवायचे असल्यास २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे होणारा तिसरा सामना त्यांना जिंकावा लागेल. त्याच अनुषंगाने इंग्लंडने या तिसऱ्या सामन्यासाठी आपल्या संघात अनेक बदल केले असून, त्यामुळे इंग्लंडचा फलंदाजी क्रम हा पूर्णपणे बदललेला दिसेल.

संघात होणार हे बदल
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बुधवारी तिसऱ्या कसोटीसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला.‌ वरच्या फळीतील अपयशी ठरत असलेल्या डॉम सिब्ली व झॅक क्राऊली यांना बाहेरचा रस्ता दाखवत इंग्लंडने काही अनुभवी खेळाडूंना संघात सामील केले आहे. त्यामुळे इंग्लंडचा फलंदाजी क्रम तिसऱ्या कसोटीत पूर्णपणे वेगळा दिसेल.

पहिले दोन सामने खेळलेला रॉरी बर्न्स तिसऱ्या कसोटीतही सलामीला उतरेल. यावेळी कदाचित त्याचा साथीदार हसिब हमीद असू शकतो. हमीदला लॉर्ड्स कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर आपली छाप पाडता आली नव्हती. जवळपास दोन वर्षाच्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेला डेव्हिड मलान तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर चांगली कामगिरी करत असलेले कर्णधार जो रूट व जॉनी बेअरस्टो दिसतील.

फलंदाजी क्रम मजबूत करण्यासाठी सहाव्या क्रमांकावर ओली पोप दिसू शकतो. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या यष्टीरक्षक जोस बटलर याला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. संघातील एकमेव अष्टपैलू व फिरकीपटू म्हणून मोईन अली खेळताना दिसेल. सॅम करन पहिल्या दोन सामन्यात सपशेल अपयशी ठरल्याने इंग्लंड या सामन्यात जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन व मार्क वूड अशा तीन वेगवान गोलंदाजांसह खेळताना दिसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तू वर्ल्ड क्लास गोलंदाज’; महिला पत्रकार बनली सिराजची चाहती, लॉर्ड्समधील प्रदर्शनाची केली स्तुती

https://mahasports.in/ind-vs-eng-indian-players-refused-to-give-passage-to-ollie-robinson-at-lords-report/

पंतमुळे ‘या’ वरिष्ठ यष्टीरक्षकाच्या कसोटी कारकिर्दीवर पूर्णविराम! उरलाय केवळ निवृत्तीचा पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---