---Advertisement---

वर्ल्डकप 2023साठी ‘कांगारूं’चा 15 सदस्यीय संघ घोषित; स्टार खेळाडू बाहेर, तर ‘या’ पठ्ठ्याची एन्ट्री

On: बुधवार, सप्टेंबर 6, 2023 9:03 AM
Australia
---Advertisement---

तोंडावर आलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी सर्व संघ झटपट आपला 15 सदस्यीय संघ घोषित करत आहेत. 5 सप्टेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी आपला संघ जाहीर केला होता. आता यामध्ये आणखी एका संघाचा समावेश झाला आहे. अशात बुधवारी (दि. 06 सप्टेंबर) बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघानेही त्यांच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात विस्फोटक फलंदाज मानल्या जाणाऱ्या मार्नस लॅब्यूशेन याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. तसेच, कॅमरून ग्रीन हा पहिल्यांदाच वनडे विश्वचषकात खेळताना दिसणार आहे.

फलंदाजीत कोणाचा समावेश?
ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी स्टीव्ह स्मिथ याच्यावर विश्वास टाकला आहे. स्मिथव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर यांच्यावरही विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत संघाची ‘नैय्या पार’ करण्याची जबाबदारी असणार आहे. मार्श सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तसेच, त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत फलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

https://twitter.com/CricketAus/status/1699226609851736134

गोलंदाजी आक्रमण कसे?
ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजी आक्रमणाविषयी बोलायचं झालं, तर या विभागाची मदार कर्णधार पॅट कमिन्स याच्या खांद्यावर असेल. कमिन्ससोबतच मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, सीन ऍबॉट यांचा समावेश असणार आहे. तसेच, फिरकी विभागाची जबाबदारी ऍडम झम्पा आणि ऍश्टन एगर यांच्या खांद्यावर असेल. स्टार्कचे प्रदर्शन प्रत्येक विश्वचषकात उल्लेखनीय राहिले आहे आणि यावेळीही संघ आपल्या प्रमुख गोलंदाजाकडून अशाच दमदार प्रदर्शनाची आशा असेल.

पहिला सामना कुणाविरुद्ध?
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला सामना भारताविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये होईल. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. तसेच, दुसरा सामना 24 आणि अखेरचा सामना 27 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. ही मालिका आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खूपच महत्त्वाची असणार आहे.

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघ-
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, ट्रेविस हेड, ऍश्टन अगर, जोश हेझलवूड, कॅमरून ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा, मिचेल स्टार्क, सीन ऍबॉट. (big news australia announced 15 members squad for icc world cup 2023 marnus labuschane lefts out)

हेही वाचाच-
ASIA CUP: सुपर 4 मध्ये भारतीय संघाविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानचा नकार? वाचा काय घडलं
“चहल खराखुरा मॅचविनर”, युझीला विश्वचषकासाठी संधी न मिळाल्याने निराश झाला दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---