क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा खराब फॉर्म कायम आहे. 2023 च्या विश्वचषकातील सरासरी कामगिरी, ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव आणि आता टी-20 फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडकडून 3-0 असा पराभव. संघाच्या या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर संघाचे सपोर्ट स्टाफ मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मिकी आर्थर, (Mickey Arthur) ग्रँट ब्रॅडबर्न (Grant Bradburn) आणि अँड्र्यू पुटिक (Andrew Puttick) यांच्या राजीनाम्याची माहिती त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. मिकी आर्थरला गेल्या वर्षी पाकिस्तानच्या पुरुष संघाचे संचालक बनवण्यात आले होते. ब्रॅडबर्न गेल्या वर्षी पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. अँड्र्यू पुटिक हे गेल्या वर्षी एप्रिलपासून संघात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांना लाहोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट ऍकाडमीने (एनसीए) गेल्या वर्षी पदभार सोपवला होता. (Big news Big changes in Pakistan cricket resignation of three support staff including Mickey Arthur)
त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचे अभिनंदन केले आहे. या सपोर्ट स्टाफच्या राजीनाम्यामागचे कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिले नसले तरी पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
View this post on Instagram
मिकी आर्थर हे पाकिस्तान क्रिकेटशी बऱ्याच काळापासून जोडले गेले आहेत. 2016 ते 2019 या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात त्यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले. या काळात पाकिस्तान संघाची कामगिरी चांगलीच होती. 2017 मध्ये मिकी आर्थरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मात्र, मिकी आर्थर आपल्या कार्यकाळात पाकिस्तान संघाला यापूर्वी दाखवलेले यश मिळवून देऊ शकले नाहीत.
विशेषत: आगामी टी20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून पाकिस्तान संघाच्या कामगिरीने चिंता ओढवली आहे. संघ सर्व फॉरमॅटमध्ये कसे पुनरागमन करेल हे पाहणे रंजक ठरणार आहे. (Big news Big changes in Pakistan cricket resignation of three support staff including Mickey Arthur)
हेही वाचा
T20 वर्ल्डकपसाठी 15 शिलेदार फिक्स? शतकी खेळी केल्यानंतर स्वतः रोहितकडून मिळाले संकेत
अफगाणिस्तानविरुद्ध मारलेल्या ‘त्या’ षटकारामागे रोहितचा दोन वर्षांचा सराव! कर्णधाराने स्वतः दिली कबुली