येत्या 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 स्पर्धेचा घाट घातला जाणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशात खेळवली जाणार आहे. अशात मोठी बातमी समोर येत आहे. शाकिब अल हसन याच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघाला स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वीच धक्का बसला आहे. बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज इबादत हुसेन दुखापतीमुळे आशिया चषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी 20 वर्षीय खेळाडूला संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशचा स्पर्धेतील पहिला सामना 31 ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्ध आहे.
इबादत हुसेन स्पर्धेबाहेर
मागील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान वेगवान गोलंदाज इबादत हुसेन (Ebadot Hossain) याला गुडघ्याची दुखापत झाली होती. मात्र, त्याला बांगलादेशच्या ताफ्यात निवडले गेले होते. तो वेळेवर फिट होऊ शकला नाही, त्यामुळे त्याला आता आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. इबादतच्या जागी अनकॅप्ड (राष्ट्रीय संघाकडून न खेळलेला खेळाडू) तंजीम हसन (Tanzim Hasan) याची निवड करण्यात आली आहे. इबादत विश्वचषकासाठी फिट होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये.
इबादत हुसेन शानदार फॉर्ममध्ये होता. त्याने मागील वर्षी पदार्पणानंतर एक सामना सोडून सर्व सामन्यात विकेट घेण्याची कामगिरी केली होती. त्याने बांगलादेशकडून 12 वनडे सामने खेळताना 22 विकेट्स नावावर केल्या आहेत. अशात त्याचे आशिया चषकातून बाहेर पडणे, संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
रिकव्हरीसाठी करू शकतो ‘हे’ काम
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे स्पोर्ट्स फिजिशियन देबाशीष चौधरी म्हणाले की, इबादतला दुखापतीनंतर 6 आठवड्यापर्यंत रिहॅबमधून जावे लागले. यादरम्यान आम्ही अनेक एमआरआय केले आणि रिपोर्ट्समध्ये समजले की, त्याचे एसीएल अजूनही चिंतेचा विषय आहे. विश्वचषकासाठी त्याच्या रिकव्हरीसाठी त्याला परदेशात नेले जाऊ शकते.
Bangladesh have made some changes to their Asia Cup squad.
Details 👇https://t.co/uKi6WR3Lnw
— ICC (@ICC) August 22, 2023
‘या’ खेळाडूला मिळाली जागा
तंजीम हसन याने अद्याप बांगलादेश संघाकडून पदार्पण केले नाहीये. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 37 अ दर्जाच्या सामन्यांमध्ये 57 विकेट्स घेतल्या आहेत. तंजीमने इमर्जिंग आशिया चषकात तीन सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, त्याने अबाहानी लिमिटेड संघाला ढाका प्रीमिअर लीग जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यात त्याने 17 विकेट्स घेतल्या होत्या. सन 2020मध्ये तो बांगलादेशकडून 19 वर्षांखालील विश्वचषकातही खेळला आहे.
आशिया चषकासाठी बांगलादेश संघ
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, नजमूल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, अफीफ हुसेन, मेहिदी हसन मिराज, तस्कीन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, नसुम अहमद, महेदी हसन, मोहम्मद नईम, शमीम हुसैन, तनजीद हसन आणि तंजीम हसन. (big news ebadot hossain ruled out from asia cup 2023 due to injury bangladesh team know who replace him)
हेही वाचा-
तिसऱ्या टी20त टीम इंडिया मारणार का बाजी? हवामान ते आमने-सामने आकडेवारी, सर्वकाही एकाच क्लिकवर
काळीज तोडणारी बातमी! दिग्गज अष्टपैलू हरपला, वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास