---Advertisement---

विश्वचषकापूर्वी इंग्लंड दौऱ्यासाठी न्यूझीलंडने निवडला वनडे संघ, दिग्गज खेळाडूंचे कमबॅक

On: बुधवार, ऑगस्ट 9, 2023 9:55 AM
New-Zealand
---Advertisement---

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघ आगामी आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. अशात इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात 4 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर यादरम्यान खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने टॉम लॅथम याला कर्णधार म्हणून निवडले आहे, तर दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याच्यासोबतच काईल जेमिसन याचेही दीर्घ काळानंतर संघात पुनरागमन झाले आहे.

विशेष म्हणजे, क्रिकेटप्रेमींसाठी आणखी एक आनंदाची बाब अशी की, या 15 सदस्यीय संघासोबत न्यूझीलंडचा प्रमुख फलंदाज केन विलियम्सन (Kane Williamson) हादेखील संघाशी जोडला जाणार आहे. जेणेकरून तो त्याच्या रिहॅबवर लक्ष देऊ शकेल.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेपूर्वी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मागील 1 वर्षांपासून न्यूझीलंड संघातून बाहेर असलेला ट्रेंट बोल्ट (Trent Boult) फक्त फ्रँचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत होता. मात्र, विश्वचषकापूर्वी संघाने आपल्या दिग्गज गोलंदाजाला ताफ्यात सामील केले आहे. तसेच, युवा गोलंदाज काईल जेमिसन (Kyle Jamierson) हादेखील पाठीच्या दुखापतीनंतर संघात परतला आहे. केन विलियम्सन एप्रिलमध्ये झालेल्या लिगामेंटच्या सर्जरीनंतर प्रशिक्षण आणि रिहॅब सुरू ठेवण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर संघासोबत जोडला जाणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मार्क चॅपमन, ईश सोधी आणि जिम्मी नीशम यांच्याविषयीदेखील माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मार्क चॅपमन आणि जिमी नीशम हे चार सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार नाहीत. कारण, ते त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्माची वाट पाहत आहेत. तसेच, ईश सोधीही क्रिकेटमध्ये व्यस्त होण्यापूर्वी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर घरी परतेल.”

इंग्लंड दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा वनडे संघ
टॉम लॅथम (कर्णधार), फिन ऍलेन, ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टीम साऊदी आणि विल यंग. (big news fast bolwers trent boult kyle jamieson return to new zealand odi squad for england series)

महत्त्वाच्या बातम्या-
सामना जिंकताच कर्णधार पंड्याचे खळबळजनक भाष्य; म्हणाला, ‘…तर आठव्या क्रमांकावर कुणाचीही गरज नाही’
जिथे विराट-रोहितला वर्षोनुवर्षे लागली, तिथे ‘या’ पठ्ठ्याने कमी काळात घडवला इतिहास; पाहा कौतुकास्पद कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---