इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 ची फायनल आज (रविवार, दिनांक 28 मे) रोजी अहमदाबादमधील श्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. टॉप फोरमधील पहिल्या दोन संघात अर्थात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघ हे अत्यंत तुल्यबळ असून अंतिम सामन्याचा निकाल काय लागेल? याचा अंदाज बांधणे भल्या भल्या क्रिकेट विश्लेषकांनाही शक्य होत नाहीये. परंतू आम्ही आता जी माहिती तुम्हाला सांगणार आहोत, त्यावरुन चेन्नईच्या फॅन्सना नक्कीच 440 व्होल्टचा धक्का लागू शकतो. याचे कारण धोनीसेनेला ही फायनल जिंकणे तसे जडच जाणार आहे.
महेंद्र सिंग धोनी हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीची पाचवी ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्या हा कर्णधार म्हणून सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. परंतू तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? की फक्त कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा आयपीएल फायनल खेळत असला तरीही यापूर्वी तो मुंबई इंडियन्सकडून अनेकदा आयपीएल फायनल खेळला आहे आणि इतकंच नाही की आजवरच्या आयपीएल कारकिर्दीत हार्दीक पांड्या जेव्हा जेव्हा फायनलला गेलाय, तेव्हा तेव्हा तो आणि त्याचा संघ हा ट्रॉफी जिंकला आहे. हे असं हार्दिक पांड्या बाबत पाचव्यांदा घडलं आहे.
हार्दिक पांड्या हा मुंबईकडून 2015, 2017, 2019, 2020 या वर्षी आयपीएल खेळलाय आणि या चारही वेळा मुंबई इंडियन्सने फायनल जिंकली होती. तसेच मागील वर्षीही 2022 हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स फायनलमध्ये गेली आणि ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे पाच वेळा आयपीएल फायनल खेळून पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा हार्दिक पांड्या जेव्हा गुजरात संघाला घेऊन सहाव्यांदा फायनलसाठी उतरेल तेव्हा पाचव्या आयपीएल ट्रॉपीचं स्वप्न घेऊन मैदानात उतरणाऱ्या धोनीसाठी आणि थालाप्रेमींसाठी ही फायनल जिंकणे आणि ट्रॉफी पटकावणे तसे सोपे असणार नाही.
अधिक वाचा –
– आधी मिठी, नंतर जर्सीवर ऑटोग्राफ! घरी परतण्यापूर्वी Mumbai Indiansचे खेळाडू भावूक, Video व्हायरल
– महाराष्ट्र प्रिमीयर लीगमधील सहभागावरून ऋतुराजवर टीकेची झोड, चाहते म्हणतायेत, “तू आता…”