---Advertisement---

टीम इंडियासाठी मोठी खुशखबर! चौथ्या टेस्टमध्ये ‘हा’ खेळाडू दिसणार प्लेइंग इलेव्हनमध्ये

On: गुरूवार, जुलै 17, 2025 7:53 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका रोमांचक आहे. लॉर्ड्सवर टीम इंडियाने उत्तम खेळ केला, पण विजय इंग्लिश संघाकडून मिळाला. इंग्लिश संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. चौथा सामना (23 जुलै) रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल.

या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी बातमी आहे. वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) चौथ्या कसोटीत प्लेइंग 11 चा भाग असेल. मालिका सुरू होण्यापूर्वी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट केले होते की बुमराह फक्त तीन कसोटी सामने खेळताना दिसणार आहे. जस्सी हेडिंग्ले आणि लॉर्ड्स येथे त्याने सामना खेळला आहे. चौथ्या कसोटीत त्याला पुन्हा एकदा विश्रांती देण्यात येईल असे मानले जात होते. पण आता तसे न करता जसप्रीत बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

भारतीय संघाला (Indian cricket team) इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला (IND vs ENG), ज्यामुळे भारताला मालिकेत 1-2 ने पिछाडीवर रहावे लागले. लॉर्ड्समध्ये हा सामना 10 जुलैपासून 14 जुलैपर्यंत खेळला गेला. दोन्ही संघांनी उत्तम खेळ दाखवला. पण पाचव्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात इंग्लंडने भारताला पराभूत केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---