भारतीय संघाची स्टार कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये दमदार प्रदर्शन केले. या कामगिरीने तिने 140 कोटी भारतीयांची मने जिंकली आहेत. पंघालने या प्रतिष्ठित स्पर्धेत कांस्य पदक आपल्या नावावर केले आहे. यासोबतच तिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटाही मिळवला आहे. या कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
गुरुवारी (दि. 21 सप्टेंबर) सर्बिया येथील बेलग्रेडमध्ये आयोजित जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप (World Wrestlers Championship) स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात फ्रीस्टाईलमध्ये अंतिम पंघाल कांस्य पदक (Antim Panghal Bronze Medal) पटकावण्यात यशस्वी झाली. तिने तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे स्वीडनच्या एम्मा माल्मग्रेन हिला 16-6ने पराभूत केले. माल्मग्रेन यावर्षी 23 वर्षांखालील युरोपीय चॅम्पियनशिप आणि वरिष्ठ युरोपीय चॅम्पियनशिपमध्ये विजेती ठरली आहे. मागील वर्षीच्या जागतिक स्पर्धेत माल्मग्रेनला कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय विनेश फोगाट हिने पराभूत केले होते.
BREAKING:
BRONZE MEDAL for ANTIM PANGHAL in World Championship & OLYMPIC QUOTA for INDIA
For India: Its maiden medal in this edition & also its 1st Wrestling Quota
➡️ Antim beat 2-time European Champion in Bronze medal bout (53kg) 16-6.
📸 @wrestling #WrestleBelgrade pic.twitter.com/kU6ffsUumQ
— India_AllSports (@India_AllSports) September 21, 2023
भारताला दिला जाणार कोटा
भारतीय कुस्ती महासंघाच्या निलंबनामुळे अंतिम पंघाल (Antim Panghal) तटस्थ ध्वजासह प्रतिस्पर्धा करत होती. मात्र, तिने जिंकलेला कोटा भारताला दिला जाईल. तिने पहिल्या टप्प्यात मोठा उलटफेर करत स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती. त्यात तिने सध्याची विश्वविजेती यूएसएची डॉमिनिक ऑलिव्हिया पॅरिशला 3-2ने पराभूत केले होते.
विनेश फोगाटविरुद्ध गेलीये न्यायालयात
अवघी 19 वर्षीय कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने यानंतर उप-फेउपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या रोक्साना मार्ता जसीना हिला 10-0ने पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत रूसच्या नतालिया मालिशेवा हिला 9-6ने नमवले. मात्र, उपांत्य सामन्यात तिला कलादजिंस्काया हिच्याकडून पराभूत व्हावे लागले. कलादजिंस्काया हिनेच टोकिया ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटलाही पराभूत केले होते.
विशेष म्हणजे, अंतिम पंघालने विनेश फोगाट हिला आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये थेट एन्ट्री करण्याचा विरोध केला आहे. विनेशला चाचणीपासून सुट मिळाली होती. मात्र, हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळले होते. अंतिम त्यावेळी इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये चाचणीत विजयी झाली होती. (big news world wrestling championship antim panghal won bronze medal get olympic quota for india)
हेही वाचाच-
यंदा महाराष्ट्र केसरी आयोजनाचा मान धाराशिवला! विजेत्यांवर होणार बक्षिसांचा पाऊस
भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन! जागतिक कुस्ती महासंघाची मोठी कारवाई, कुस्तीपटूंसाठी चिंतेची बाब