टी20 विश्वचषकात भारतीय संघाला अपेक्षित यश लाभले नाही. त्यामुळे संघात अनेक बदल केले जावे अशी मागणी होत आहे. या मागणीवर चर्चा देखील सुरू झाली असून, लवकरच याबाबतच्या अधिकृत घोषणा होतील. पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या बांगलादेश दौऱ्यापूर्वी या सर्व गोष्टींना मूर्त स्वरूप दिले जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचे पुढील एक वर्षाचे नियोजन जवळपास ठरले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे, बीसीसीआय व संघ व्यवस्थापन यांच्या दरम्यान चर्चा झाली असून, या चर्चेतून अनेक मार्ग काढले गेले आहेत. संघाचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली व रविचंद्रन अश्विन हे आता टी20 क्रिकेट खेळताना दिसण्याची शक्यता अगदी कमी आहे. या खेळाडूंना निवृत्तीसाठी बोलले गेले नाही. मात्र, ते अगदी कमी प्रमाणात टी20 क्रिकेट खेळताना दिसू शकतात. तसेच, हार्दिक पंड्या नवा टी20 कर्णधार असेल.
पुढील वर्षी भारतातच वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. त्या विश्वचषकाच्या दृष्टीने हे अनुभवी खेळाडू तयारी करताना दिसतील. अनुभवी खेळाडूंचा जास्तीत जास्त वापर वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये होईल.
भारतीय संघाला 2023 वनडे विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी तब्बल 25 वनडे सामने खेळायचे आहेत. त्यामुळे या सर्व सामन्यात पहिल्या पसंतीचा संघ उतरवला जाऊ शकतो. विश्वचषकासाठीच्या प्रमुख खेळाडूंना एकत्र अधिक वेळ देण्यात यावा असे, भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी देखील सुचवले होते. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात बांगलादेश दौऱ्यापासून करेल. या दौऱ्यावर भारतीय संघाला तीन वनडे सामने खेळायचे आहे.
(Big Update On Team India Next One Year Plan Ahead 2023 ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे, हे काय बोलून गेला इंग्लंडचा कोच! मॅक्युलम म्हणाला, ‘पाकिस्तानविरुद्ध हरलो तरी चालेल…’
विराट कोहली विरुद्ध तू असा सामना झाला तर कोण जिंकेल? सूर्या म्हणाला, ‘अर्थातच…’