दोन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 10 धावांनी पराभव केला. यापूर्वी अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आफ्रिकन संघाचा 2-1 असा पराभव केला होता. अफगाणिस्तानपाठोपाठ आता आयर्लंडने आफ्रिकेला 440 व्होल्टचा धक्का दिला आहे. या दोघांमधील मालिकेतील दुसरा टी20 सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळला गेला. आयर्लंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा पहिला विजय आहे.
आफ्रिकेने मालिकेतील पहिला टी20 जिंकला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो की त्यांच्यावरच उलथला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या आयर्लंडने 20 षटकांत 195/6 धावा ठोकल्या. संघासाठी सलामी देणाऱ्या रॉस एडेअरने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 58 चेंडूंत 5 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. याशिवाय कर्णधार पॉल स्टर्लिंगने 31 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 137(79 चेंडू) धावांची भागीदारी केली.
HISTORY AT ABU DHABI…!!!!
IRELAND HAS BEATEN SOUTH AFRICA FOR THE FIRST TIME IN T20I HISTORY 👊🥶 pic.twitter.com/L5nLZdyU3q
— Johns. (@CricCrazyJohns) September 29, 2024
मोठ्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा 10 धावांनी पराभव झाला. संघाला 20 षटकात 9 गडी बाद 185 धावाच करता आल्या. रीझा हेंड्रिक्स आणि मॅथ्यू ब्रेट्झके यांनी संघाकडून सर्वात मोठी खेळी खेळली. हेंड्रिक्सने 32 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 51 धावा केल्या, तर ब्रित्झकेने 41 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा केल्या. मात्र, दोघांच्या खेळी संघाला विजयाची रेषा ओलांडण्यास पुरेशा ठरल्या नाहीत.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला आयरिश गोलंदाजांनी विजयी रेषेच्या अलीकडेच रोखले. मार्क अडायरने संघाकडून सर्वाधिक 4 बळी घेतले. ग्रॅहम ह्यूमने 3 बळी घेतले. उर्वरित 1-1 असे यश मॅथ्यू हम्फ्रे आणि बेंजामिन व्हाईट यांना मिळाले.
हेही वाचा-
निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी; ट्रॅव्हिस हेडचा इंग्लंडला दणका, मालिका खिश्यात
“ना ना म्हणत 10 हंगाम खेळेल”, धोनीच्या निवृत्तीबाबत केकेआरचा संघमालक शाहरुखचे मजेशीर विधान
सॅमसनसाठी महत्वाची असेल बांगलादेशविरुद्धची टी20 मालिका, संधी दवडल्यास संपेल कारकीर्द!!