---Advertisement---

टी२० विश्वचषक तर आम्ही जिंकणारच, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटरने व्यक्त केला आत्मविश्वास

On: बुधवार, सप्टेंबर 16, 2020 3:57 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाच्या प्रदर्शनात बरीच सुधारणा होत आहे. त्यांच्याकडे राशिद खान आणि मुजीब उर रेहमान हे उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. मोहम्मद नबीसारखा दिग्गज अनुभवी अष्टपैलूदेखील अफगाणिस्तान संघात आहे. 2019 मध्ये नबीच्या नेतृत्वात अफगानिस्तान संघाने बांग्लादेश संघाला कसोटी सामन्यात पराभूत केले होते. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला होता. आपला संघ टी20 विश्वचषक जिंकू शकतो असा आत्मविश्वास याच संघाचा कर्णधार रशीद खानला आहे. आर अश्विनच्या यूट्यूब शो मध्ये त्याने हजेरी लावली होती. यावेळी तो बोलत होता.

तो म्हणाला, “संपूर्ण देशाला आणि आम्हा सर्वांना आशा आहे की आम्ही टी20 विश्वचषक जिंकू. जेव्हा आम्ही भारतीय संघाविरुद्ध कसोटी सामना खेळलो तेव्हा ते प्रत्येकासाठी स्वप्नापेक्षा मोठी गोष्ट होती. जेव्हा आम्ही भारतासमोर पहिली कसोटी खेळत होतो तेव्हा मला माहित नव्हते की आम्ही काय करीत होतो. प्रत्येक खेळाडू म्हणत होता की मैदानात जाऊन चौकार मारेन, षटकार मारेन. पहिल्या कसोटीत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी खेळाडू उत्सुक होते. हा सामना आमच्यासाठी सर्वोत्कृष्ट नव्हता परंतु आम्ही त्यातून बर्‍याच गोष्टी शिकल्या.”

राशिद खान सध्या विश्व क्रिकेटमध्ये टी२० प्रकारातील अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्यानंतर त्याच्या संघातील फिरकीपटू मुजीब उर रहमान याचे नाव येते. राशिद खान आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे.

अफगाणिस्तान संघाला गोलंदाजांची उणीव जाणवत नाही पण फलंदाजांच्या बाबतीत हा संघ मागे आहे. धावा फटकावल्यानंतर गोलंदाज आपले काम करण्यास सक्षम असतात. राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रेहमान यांची निवड सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये केली जाते. टी20 क्रिकेटमध्ये या संघाने अतिशय कमी वेळात उत्तम कामगिरी केली आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत हा संघ काय करेल हे पहावे लागेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---