भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे, ज्या ठिकाणी टीम इंडियाने फलंदाजीपासून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणापर्यंत आपली तयारी सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण अलीकडे चेन्नईत लाल मातीच्या खेळपट्टीचा विषय चर्चेत आला आहे. क्रिकेटमध्ये मुख्यतः लाल आणि काळ्या मातीच्या खेळपट्ट्या तयार केल्या जातात. पण या दोन्हीमध्ये काय फरक आहे? चला तर मग या बातमीद्वारे जाणून घेऊयात.
लाल माती
लाल मातीची खेळपट्टी कमी पाणी शोषून घेते आणि त्यामुळे ती लवकर कोरडे होऊ लागते. तुम्ही पाहिलं असेल की कसोटी सामन्यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवसापर्यंत खेळपट्टीत मोठ्या भेगा पडतात. लाल माती कोरड्या स्वभावामुळे लवकर फुटायला लागते.
लाल मातीच्या खेळपट्टीवर सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना भरपूर उसळी मिळते. पण मातीला तडे जाऊ लागल्याने फिरकी गोलंदाजीमध्ये अधिक वळण दिसून येते. पहिल्या 2 दिवसात फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. परंतु शेवटच्या 2-3 दिवसांत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व सुरू होते.
काळी माती
काळ्या मातीची खेळपट्टी तयार केल्यावर त्यात चिकणमातीचे प्रमाण अधिक असते. लाल मातीच्या तुलनेत काळ्या मातीची खेळपट्टी जास्त पाणी शोषून घेते. ज्यामुळे ती जास्त काळ भेगा न पडता सपाट राहते. अशा खेळपट्टीवर चेंडूला असामान्य उसळी दिसणे सामान्य आहे, म्हणून, काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळण्यापूर्वी, फलंदाजांना सुरुवातीला क्रीजवर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो. काळ्या मातीची खेळपट्टी सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजीसाठी योग्य ठरू शकते.
हेही वाचा-
“काम अजून बाकी आहे…”, शतकी खेळीनंतर इशान किशनने उघड केले मनसुबे
भारताला चितपट करण्यासाठी बांगलादेशच्या संघाने सुरू केली तयारी, सरावाचे फोटो आले समोर
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज