मुंबई | विंडीजविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यासाठी भारत एकादश संघाची आज घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्राच्या अंकित बावणेचा समावेश करण्यात आला आहे.
या सामन्यासाठी संघाचे कर्णधारपद करुण नायरकडे देण्यात आले आहे. तर इशान किशन यष्टीरक्षक म्हणुन जबाबदारी पार पाडणार आहे.
मुंबईकर पृथ्वी शाॅ आणि श्रेयस अय्यरचाही या संघात समावेश आहे. हा सामना कसोटी मालिकेपुर्वी खेळवला जाणार आहे.
कसोटी मालिकेला ४ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात विंडीज २ कसोटी, ५ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे.
सराव सामन्यासाठी भारत एकादशचा संघ-
मयांक अग्रवाल, पृथ्वी शाॅ, हनुमा विहारी, करुन नायर (कर्णधार), श्रेयस अय्यर, अंकित बावणे, इशान किशन (यष्टीरक्षक), जलज सक्सेना, सौरव कुमार, बसिल थंपी, आवेश खान, के विग्नेश, इशान पोरेल
या दौऱ्याची सुरुवात ४ ऑक्टोबरला राजकोट कसोटी सामन्याने होणार असुन शेवटचा टी२० सामना ११ नोव्हेंबरला चेन्नईला होणार आहे.
५ वन-डे सामन्यांपैकी २ सामने महाराष्ट्रात होणार आहेत. त्यातील तिसरा वन-डे सामना २७ ऑक्टोबरला पुण्याला तर चौथा वन-डे सामना २९ ऑक्टोबरला मुंबईला होणार आहे.
असे आहे विंडीजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक-
कसोटी मालिका-
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑक्टोबर (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट)
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑक्टोबर (राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद)
वन-डे मालिका-
पहिला वन-डे सामना- २१ ऑक्टोबर (बारसपारा स्टेडियम, गुवाहटी)
दुसरा वन-डे सामना- २४ ऑक्टोबर (होळकर स्टेडियम,इंदोर)
तिसरा वन-डे सामना- २७ ऑक्टोबर (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे)
चौथा वन-डे सामना- २९ ऑक्टोबर (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
पाचवा वन-डे सामना- १ नोव्हेंर (ग्रिनफिल्ड स्टेडियम, तिरुअनंतपुरम)
टी-२० मालिका-
पहिला टी-२० सामना- ४ नोव्हेंबर (इडन गार्डन्स, कोलकाता)
दुसरा टी-२० सामना- ६ नोव्हेंबर (कानपूर किंवा लखनऊ)
तिसरा टी-२० सामना- ११ नोव्हेंबर (चेपॉक स्टेडियम, चेन्नई)
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनीसाठी आजचा दिवस खास, बांगलादेशविरुद्ध होऊ शकतो विक्रमांचा विक्रम
–या कारणामुळे सुनील गावस्करांनी फकार जामन आणि दिनेश कार्तिकला सुनावले खडेबोल
–धोनीच्या त्या निर्णयामुळे माझे आयुष्य बदलले- केदार जाधव