आजपासून (९ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगच्या १४ हंगामाला प्रारंभ होणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमने-सामने असणार आहेत. तसेच दुसऱ्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर दिल्ली कॅपिटल्स संघाचे आव्हान असणार आहे.
या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघ कसून सराव करताना दिसून येत आहे.तसेच सरावाच्या वेळी मैदानात प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंगने एन्ट्री केल्याचे पाहायला मिळाले आहे.
गतवर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरी गाठली होती. परंतु त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले होते. त्यामुळे, आयपीएल २०२१ स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यासाठी हा संघ आणखी मेहनत घेताना दिसून येत आहे. अशातच या संघाचे सरावसत्र सुरू असताना प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंग याने एन्ट्री घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच त्याने अजिंक्य रहाणे सोबत एक फोटो शेअर करत शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
रणवीर सिंगने अजिंक्य रहाणे सोबतचा एक फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर कॅप्शन म्हणून त्याने “स्पर्धेसाठी शुभेच्छा चॅम्पियन” असे लिहिले आहे.
https://twitter.com/RanveerOfficial/status/1380055464776331267
त्यासोबत अजिंक्य रहाणेने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रणवीर त्याला गोलंदाजी करताना दिसून येत आहे तर अजिंक्य रहाणे शॉट खेळताना दिसून येत आहे. या व्हिडिओवर रहाणेने कॅप्शन म्हणून लिहिले आहे की,” जेव्हा सिंबा माझ्या गल्लीत येतो, तेव्हा एक क्रिकेटचा शॉट तर बनतोच ना.”
Have definitely featured this bowlers name to feature in my 11 ???? @RanveerOfficial pic.twitter.com/ogJ4bWLXYt
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) April 8, 2021
असे म्हटले जात आहे की, रणवीर त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. रणवीर सिंग लवकरच मोठ्या पडद्यावर, माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांची भुमिका साकारताना दिसून येणार आहे. येत्या ४ जूनला त्याची प्रमुख भुमिका असलेला चित्रपट ‘८३ ‘ प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्याच सामन्यात रोहित-विराटसह मुंबई आणि बेंगलोरचे ‘हे’ खेळाडू घालू शकतात मोठ्या विक्रमांना गवसणी
बालपणीच्या ‘मिसेस धोनी’ला ओळखण झालं कठीण, माय-लेकीच्या फोटोने चाहत्यांना पाडलं पेचात!
एमएस धोनी ते रिषभ पंत! जाणून घ्या यंदाच्या आयपीएल मधील आठही संघांचे कर्णधार






