---Advertisement---

आयपीएल ट्रॉफी की बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींची कमाई? चाहत्याच्या प्रश्नावर ‘किंग खान’चे जबराट उत्तर

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 1:51 PM
---Advertisement---

आयपीएलच्या इतिहासात दोन वेळेस जेतेपद मिळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा क्रिकेटबद्दलचे आपले प्रेम नेहमीच व्यक्त करत असतो. तसेच तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना पाहण्यासाठी नेहमी स्टेडियममध्ये हजेरी लावत असतो. याबरोबरच वेळात वेळ काढून तो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी गप्पा देखील मारत असतो. आयपीएल २०२१ सुरू व्हायला काही दिवस शिल्लक असताना त्याला सोशल मीडियावर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर, शाहरुखने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तसेच केकेआर संघ या स्पर्धेचा पहिला सामना ११ एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद संघासोबत खेळणार आहे. या सामन्यापूर्वी शाहरुखने ट्विटर वर #आस्कएसआरके नावाने एक चर्चासत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये त्याला एका चाहत्याने आयपीएल ट्रॉफी की बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींची कमाई? असा प्रश्न विचारला होता.

यावर मजेशीर प्रतिक्रिया देत शाहरुख म्हणाला,” मी मल्टिपल चॉइस प्रश्नांमध्ये कधीही चांगला नव्हतो. मला तर वाटतं की सर्व उत्तरे योग्य असावीत.”

या चर्चासत्रात अनेक क्रिकेट चाहते, शाहरुखला प्रश्न विचारत होते. एका चाहत्याने विचारले होते की, “भाई, केकेआर यावेळेस कप घेऊन येणार ना?” या प्रश्नावर देखील शाहरुखने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, “मी आशा करत आहे, मला त्याच कप मध्ये कॉफी प्यायला सुरुवात करायची आहे.”

कोलकाता नाईट रायडर्स संघाला युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. यंदा कोलकाता संघाचे सूत्र ओएन मॉर्गनच्या हाती आहे. तसेच युवा शुबमन गिल देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच या संघात शाकिब अल हसनचे पुनरागमन झाले आहे. यासोबतच या संघात अनुभवी हरभजन सिंग देखील असणार आहे. त्यामुळे यंदा केकेआर संघ चांगली कामगिरी करू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

सलग २ हंगामात फ्लॉप ठरलेल्या ‘मॅक्सभाऊ’साठी आरसीबीने का मोजले १४.२५ कोटी? ऐका ‘राज की बात’

अरेरे! युवराजने ६ संघ बदलले, मात्र ‘या’ जिगरी मित्रांसोबत आयपीएल खेळण्याचे सौभाग्य नाही लाभले

नादच खुळा! खेळाडूने झेल टिपण्यासाठी मारली अद्भुत डाईव्ह; तुम्हालाही बसणार नाही डोळ्यांवर विश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---