भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये प्रतिष्ठेच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 5 कसोटी सामने होणार आहेत. या मालिकेपूर्वीच बीसीसीआय आपला संघ ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहे. त्यामुळे भारतीय संघातील युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा अनुभव घेता येणार आहे.
भारत ‘अ’ संघ या वर्षाच्या अखेरीस प्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीच्या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध दोन प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी (28 मे) याची घोषणा केली आहे.
पहिला सामना मॅकेच्या ग्रेट बॅरियर रीफ एरिना येथे 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुसरा सामना खेळला जाणार आहे. या सराव सामन्यांमुळे दोन्ही संघांच्या उदयोन्मुख (EMERGING) खेळाडूंना कसोटी संघात स्थान मिळवण्याची संधी मिळेल.
“अपग्रेड केलेल्या ग्रेट बॅरियर रीफ एरिना आणि मेलबर्न येथे ‘अ’ सामन्यांचे आयोजन केल्याने या ‘अ’ सामन्यांना महत्त्वाचा दर्जा मिळेल, आणि दोन्ही संघातील खेळाडूंना निवडीसाठी हात पुढे करण्याची उत्तम संधी मिळेल,” असे पीटर रॉच, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख म्हणाले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. 1991-92 च्या हंगामानंतर ही प्रतिष्ठित मालिका पाच कसोटी सामन्यांपर्यंत वाढवण्याची ही पहिलीच वेळ आहे. बॉर्डर-गावस्कर टेस्ट मालिकेचा पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबर रोजी पर्थ येथे सुरु होईल आणि 3 ते 7 जानेवारी दरम्यान पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याचा शेवट सिडनी क्रिकेट मैदानावर होईल.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर: पर्थ स्टेडियम, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर: ॲडलेड ओव्हल, ॲडलेड (दिवस-रात्र सामना)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर: द गाबा, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर: मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी: सिडनी
ऑस्ट्रेलियाने 2017 पासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकलेली नाही, 2018-19 आणि 2020-21 मधील मायदेशात झालेल्या दोन मालिका 2-1 ने गमावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी अपडेट: MPL 2024चे वेळापत्रक जाहीर, पाहा तुमच्या आवडत्या टीमचे वेळापत्रक