भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) मालिकेला (22 नोव्हेंबर) पासून सुरू होणार आहे. पर्थच्या मैदानावर पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसनने (Shane Watson) ऑस्ट्रेलियन संघाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीसोबत (Virat Kohli) वाद टाळण्याचा सल्ला दिला आहे कारण त्याचा विश्वास आहे की दिग्गज भारतीय फलंदाज भडकल्यावर ज्या उत्कटतेने खेळतो त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी होईल.
शेन वॉटसनने (Shane Watson) विलो टॉक पॉडकास्टशी बोलताना सांगितले की, “मला विराटबद्दल एक गोष्ट माहित आहे ती म्हणजे सामन्यातील प्रत्येक चेंडूवर तो आणणारा जोश विलक्षण आहे. पण अलीकडच्या काळात असे काही क्षण आले आहेत की त्याच्या आतली ही आग विझू लागली आहे कारण सामन्याच्या प्रत्येक क्षणात ती तीव्रता राखणे फार कठीण आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कोहलीला एकटे सोडले पाहिजे. कारण तो पहिल्यासारखा आक्रमक अंदाजात खेळला तर तो खूप विलक्षण आहे.”
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
संजू सॅमसन बनला कर्णधार! टी20 स्पर्धेसाठी संघ जाहीर
विराट कोहली नाही, तर ‘या’ भारतीय खेळाडूला घाबरतोय ऑस्ट्रेलिया संघ
IND vs AUS; भारताने ऑस्ट्रेलियात कधी खेळला होता शेवटचा सामना? काय होता निकाल?