भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने जयपूर-राजस्थान येथे सुरू असलेल्या ६७ व्या अखिल भारतीय पोलीस कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघाचा बादफेरीत प्रवेश मिळवला. पुरुष विभागात ओडिशा, गोवा, सीआयएसफ, पंजाब, कर्नाटक संघाच बादफेरीत प्रवेश.
महिला विभागात महाराष्ट्र पोलीस संघाने काळ चंदीगड संघावर ३८-०५ असा विजय मिळवत दुसरा विजय मिळवला. ब गटातील महाराष्ट्र व राजस्थान संघांनी २-२ विजय मिळवत बादफेरीत प्रवेश केला. दोन्ही संघातील महत्वपूर्ण सामना बाकी आहे.
तर महाराष्ट्र पुरुष संघाने आज सकाळ सत्रात आरपीफ चा ४२-२३ असा विजय मिळवत गटातील सर्व सामने जिंकले. दोन विजयसह बादफेरीत प्रवेश मिळवला. ओडिशा संघाने आरपीफ चा ५३-३९ पराभव करत बादफेरीत प्रवेश केला.
तर गोवा पोलीस पुरुष संघाने ३३-२० असा गुजरात पोलीस संघावर विजय मिळवत दुसरा विजय मिळवला. तर पंजाब पोलिसांनी ५३-१३ असा गुजरात संघाचा पराभव करत बादफेरीत प्रवेश केला. सीआयएसफ ने कर्नाटक पोलीस संघाचा ४१-१५ असा पराभव करत दोन विजयासह बादफेरीत प्रवेश केला. तर कर्नाटकने चंदीगडचा ४९-२२ पराभव करत बादफेरीत प्रवेश मिळवला.
साखळीतील पुरुष व महिला विभागाचे काही सामने शिल्लक असून आज सायंकाळ सत्रात ते सामने होतील. त्यानंतर बादफेरीच्या सामन्याचा पूर्ण कार्यक्रम जाहीर होईल.