न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याच्याबाबत एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. क्रिकेटविश्वातील घातक गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या बोल्टला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या केंद्रिय करारातून मुक्त केले आहे. बोर्डाने बोल्टच्या मागणीनंतर हा निर्णय घेतला आहे. बोल्टला त्याच्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवायचा असल्याने त्याने बोर्डाशी आपल्याला केंद्रिय करारातून मुक्त करण्यात यावे अशी विनंती केली होती. त्याच्या विनंतीला मान्य करत बोर्डाने त्याला करारातून मुक्त केले आहे.
आता बोर्डाच्या केंद्रिय करारातून मुक्त झाल्यानंतर बोल्ट घरेलू लीगमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध राहू शकेल. असे असले तरीही, न्यूझीलंड बोर्डाने त्याला केंद्रिय करारातून बाहेर केले म्हणजे त्याची चमकदार आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली, असा या निर्णयाचा अर्थ होत नाही. न्यूझीलंड क्रिकेटने (NZC) स्पष्ट केले आहे की, ते सध्या करारबद्ध असलेल्या खेळाडूंच्या निवडीला प्राधान्य देतील.
न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ डेविड व्हाईट यांनी म्हटले आहे की, “आम्ही बोल्टच्या स्थितींना समजून घेतले आणि त्याचा सन्मान करतो. तो त्याच्या खेळाप्रती प्रामाणिक आहे. तो केंद्रिय कराराचा भाग नसल्याची आम्हाला नक्कीच खंत आहे. परंतु आम्ही त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो.”
https://www.instagram.com/p/ChDehiQsktC/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान बोल्ट न्यूझीलंड संघाच्या सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ५४८ विकेट्सची नोंद आहे. ७८ कसोटी सामने खेळताना त्याने ३१७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये ९३ सामन्यात १६९ विकेट्स आणि ४४ टी२० सामन्यांमध्ये ६२ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र आता त्याचा करार संपल्याने तो बोर्डाकडून फार कमी सामन्यांसाठी उपलब्ध राहू शकतो. जेव्हा तो उपलब्ध असेल, तेव्हाच त्याची न्यूझीलंड संघात निवड केली जाऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘शिखर एकाच फॉरमॅटचा खेळाडू आहे का?’, स्वत: धवनने दिले दिलखुलास उत्तर
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ३ वेळा ‘एवढ्या’ कमी धावसंख्येत रोखलंय, पाहा रेकॉर्ड
इन्ज्यूरी, कोरोना अन् पुनरागमन! केएल राहुल तब्बल ९ महिन्यानंतर दिसणार मैदानावर