पुणे। बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड आणि कासट सारीज रविवार पेठ पुरस्कृत यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाऊन्स टेनिस अकादमी -एमएसएलटीए एआयटीए 14वर्षांखालील सुपर सिरिज 2022 स्पर्धेत सुजय देशमुख, नीरज जोर्वेकर, रोहन बजाज या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात सुजय देशमुखने अझलन शेखचा 9-1 असा तर, नीरज जोर्वेकरने ईशान गुंडेचा 9-2 असा पराभव करून आगेकूच केली.
निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
सुजय देशमुख(महा)वि.वि.अझलन शेख(महा)9-1;
सिद्धांत थोरवे(महा)वि.वि.रणवीर गुंड(महा)9-6;
आबीर श्रीवास्तवा(मध्यप्रदेश)वि.वि.अनुराग सतीश 9-5;
सिद्धेश खाडे(महा)वि.वि.तनिष पाटील(महा)9-2;
नील आंबेकर(महा)वि.वि.अर्जुन अरबळे 9-5;
नीरज जोर्वेकर(महा)वि.वि.ईशान गुंडेचा(महा) 9-2;
अर्जुन वेलूरी(महा)वि.वि.रुद्र नेहेते(महा) 9-0;
सिध्दांत कुलकर्णी(महा)वि.वि.नमिश हूड(महा) 9-6;
अंकित राय(महा)वि.वि.नीव कोठारी(महा) 9-3;
रोहन बजाज(महा)वि.वि.आरव पटेल(महा) 9-5
महत्त्वाच्या बातम्या –
डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज: संप्रित शर्मा, ओंकार शिंदे यांची आगेकूच
‘आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकलो असतो, पण…’, आरसीबीच्या कर्णधाराने सांगितली कुठे झाली चूक