---Advertisement---

‘कॅप्टनकूल’ धोनीला केन विलियम्सन पडला भारी, मोडला हा कूल विक्रम

On: शुक्रवार, जानेवारी 24, 2020 7:33 PM
---Advertisement---

आज (24 जानेवारी) ईडन पार्क (Eden Park), ऑकलँड (Auckland) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना (1st Match of T20 Series) पार पडला. हा सामना भारताने 6 विकेट्सने (Won by 6 Wicketes) जिंकला आहे. तसेच या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी आज न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने एक खास विक्रम केला आहे.  तसेच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) मागे टाकले आहे.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून विलियम्सनने 26 चेंडूत 51 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्यामुळे आता त्याचे कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 40 सामन्यात 31.50 च्या सरासरीने 1134 धावा झाल्या आहेत.

यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत धोनीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. टी20 मध्ये धोनीने कर्णधार म्हणून 72 सामन्यात 37.06 च्या सरासरीने 1112 धावा केल्या आहेत.

तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) असून त्याने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1273 धावा केल्या आहेत.

तसेच भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आज न्यूझीलंड विरुद्ध 45 धावा केल्या. त्यामुळे आता त्याच्या कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 34 सामन्यात 1077 धावा झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-

1273 – फाफ डू प्लेसिस (40 सामने)

1134 – केन विलियम्सन (40 सामने)

1112 – एमएस धोनी (72 सामने)

1077 – विराट कोहली (34 सामने)

1013 – ओएन मॉर्गन (43 सामने)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---