---Advertisement---

इंग्लंडला घाम फोडणारा श्रीलंकन पठ्ठ्या वर्ल्डकपमधून बाहेर, बदली खेळाडूचीही झाली घोषणा

Sri-Lanka-Team
---Advertisement---

भारतात सुरू असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसत आहे. विश्वचषकात प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता विक्रम बनत आणि मोडला जात आहे. दुसरीकडे, बलाढ्य संघांना झटका बसताना दिसत आहे. संघांचे महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर होताना दिसत आहेत. यामध्ये श्रीलंका संघाचा समावेश झाला आहे. श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धेचा अर्धा प्रवास पूर्ण झाला आहे. सर्व संघांनी प्रत्येकी 5 सामना खेळले आहेत. अनेक संघांना स्पर्धेत सुरुवातीला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, झुंज देत या संघांनी चांगले पुनरागमन केले. त्यापैकीच एक श्रीलंका (Sri Lanka) संघही आहे. श्रीलंकेने सुरुवातीच्या 3 सामन्यात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला होता.

महत्त्वाचा खेळाडू स्पर्धेबाहेर
मात्र, मागील दोन सामन्यात नेदरलँड्स आणि इंग्लंड संघाचा पराभव करत श्रीलंकेने लय पकडली. मात्र, अशातच श्रीलंकेला स्पर्धेच्या मध्येच मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा (Lahiru Kumara) दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी दुष्मंथ चमीरा याला संघात सामील केले गेले आहे. याची माहिती श्रीलंकेने दिली आहे.

लाहिरूने इंग्लंडविरुद्ध मिळवून दिलेला विजय
श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा याने मागील सामन्यात शानदार प्रदर्शन केले होते. त्याने इंग्लंडविरुद्ध शानदार गोलंदाजी करत संघाला सलग दुसरा विजय मिळवून दिला होता. बंगळुरूतील इंग्लंडविरुद्ध श्रीलंकेच्या विजयाचा तो नायक होता. त्याने 7 षटके गोलंदाजी करताना फक्त 35 धावा खर्चून 3 मोठ्या विकेट्स घेतल्या होत्या. त्यात जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन आणि बेन स्टोक्स यांचा समावेश होता. यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. अशात, श्रीलंकेला लाहिरूची उणीव नक्की भासेल. (bowler dushmantha chameera has replaced lahiru kumara in sri lankas world cup 2023 squad)

हेही वाचा-
विश्वचषक 2023मध्ये भारत पहिल्यांदाच करणार ‘हे’ काम, इंग्लंडने जिंकला टॉस; Playing XIमध्ये नाही कोणताच बदल
हारलेल्या सामन्यातही न्यूझीलंडने घडवला इतिहास! विश्वचषकात ‘असा’ जबरदस्त पराक्रम करणारा पहिलाच संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---