टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा संपली असून आता पुन्हा एकदा संघांमध्ये द्विपक्षीय मालिकांचा घाट घातला गेलाय. इंग्लंड संघ आपला अर्धवट राहिलेला ऑस्ट्रेलियाचा दौरा पूर्ण करत आहे. या दौऱ्यातील 3 टी20 सामने विश्वचषकापूर्वीच पार पडले. ही मालिका इंग्लंडने खिशात घातली. मात्र, आता इंग्लंडच्या पारड्यात पराभव पडत आहेत. पहिल्या सामन्यापाठोपाठ दुसऱ्या सामन्यावरही इंग्लंडला पाणी सोडावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडला 72 धावांनी धूळ चारली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क याने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. आता मिचेल स्टार्कचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.
इंग्लंडविरुद्ध मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला. त्याने इंग्लंडचा दिग्गज खेळाडू डेविड मलान (David Malan) याला त्रिफळाचीत करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. झाले असे की, इंग्लंडच्या डावाच्या पहिल्या षटकात स्टार्कने 2 विकेट्स घेत मैफील लुटली. आधी त्याने जेसन रॉयला बाद केले आणि षटकाच्या पाचव्या चेंडूवर असा काही खतरनाक चेंडू टाकला, ज्याचे मलानकडे उत्तरच नव्हते. चेंडू खेळण्यासाठी पावले पुढे टाकताच मलान त्रिफळाचीत झाला. त्यालाही विश्वास बसला नाही की, तो अशाप्रकारे बाद कसा झाला.
खरं तर, ज्या चेंडूवर मलान बाद झाला, तो चेंडू खेळपट्टीवर टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला चकवत आपली लाईन बदलतो. मलानकडे या चेंडूवर बाद होण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नव्हता. मलान धावा न करताच पव्हेलियनमध्ये परतला. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड मैदानावर उतरताच मिचेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर आपल्या घातक वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना घाम फोडला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टार्कच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
That is a SEED from Starc!#AUSvENG | #PlayOfTheDay | #Dettol pic.twitter.com/XISUPw34Pm
— cricket.com.au (@cricketcomau) November 19, 2022
A ball seemingly pitched on leg stump by a left armer goes across and clips the off stump..
Ball of the Century ?
No one , i repeat no one is ever as good Starc if he is on song..!! pic.twitter.com/805hgKNvLu— Aadarsh Ravishankar (@SportsManiacAR5) November 19, 2022
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 280 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथ याने 94 धावांची वादळी खेळी केली होती. यामध्ये 1 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. स्मिथने आदिल रशीद याला झेलबाद करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान इंग्लंडला पार करता आले नाही. इंग्लंड संघाचा डाव 38.5 षटकात 208 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 72 धावांनी आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघातील तिसरा वनडे सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. (bowler mitchell starc inswinger bold dawid malan see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू जो मिला…’, टीम इंडियाच्या ‘गब्बर’ची मुलगा झोरावरसोबत जोरदार मस्ती, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
पदार्पणात फ्लॉप ठरलेल्या गिलच्या पाठीवर धोनीने ठेवलेला हात; स्वतः सांगितला तो किस्सा






