लंडन | भारत अ, विंडीज अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात झालेल्या एकदिवसीय तिरंगी मालिकेत भारतीय संघाने विजेतेपद मिळवले आहे.
सोमवार, २ जुलैला झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड लायन्सचा ५ गडी राखून पराभव केला.
इंग्लंड लायन्सने प्रथम फलंदाजी करताना सॅम हेन १०८ आणि लायम लिविंगस्टोनच्या ८३ धावांच्या जोरावर ५० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात २६४ धावा केल्या.
इंग्लंड लायन्सला २६४ धावांवर रोखण्यात दीपक चहरने तीन बळी घेत मोलाची भूमिका निभावली. त्याचबरोबर खलिद अहमदनेही तीन बळी मिळवले.
या अंतिम सामन्यात २६५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने हे आव्हान ४८.४ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले.
भारताकडून फलंदाजी करताना ऋषभ पंतने ६७, कर्णधार श्रेयस अय्यरने ४४ आणि संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱ्या मयांक आग्रवालने ४० धावांचे योगदान दिले.
तर कृणाल पंड्याने गोलंदाजीत एक बळी व ३७ धावा करत सहाव्या गड्यासाठी ऋषभ पंतबरोबर ७१ धावांची महत्त्वाची भागिदारी केली.
इंग्लंडकडून गोलंदाजीत लायम डाउसन वगळता एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
लायम डाउसनने ९ षटकात ३७ धावा देत २ बळी मिळवले.
भारतीय अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या दीपक चहर आणि कृणाल पंड्याची दुखापतग्रत जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या जागी इंग्लड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-कर्णधार कोहली म्हणतो, आम्हाला कमी समजणं इंग्लंडला महागात पडू शकत
-फिफा विश्वचषक: नेमारची जादू चालली, ब्राझील उपांत्यपूर्व…