टोकियो। ऑलिंपिक २०२० मध्ये दहाव्या दिवशी म्हणजेच रविवारी (१ ऑगस्ट) पुरुष बॉक्सिंगमधील ९१+ किलो वजनी गटातील राऊंड ८ (उपांत्यपूर्व फेरी) मधील सामना भारत आणि उझबेकिस्तान संघात पार पडला. या सामन्यात भारताकडून सतीश कुमार, तर उझबेकिस्तानकडून बखोदिर जलोलोव हे बॉक्सर आमने- सामने होते. या सामन्यात भारताचा पहिला सुपर हेवीवेट बॉक्सर सतीश कुमारला जलोलोवने ५-० ने पराभूत केले आहे. त्यामुळे सतीशचे या ऑलिंपिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे.
पहिल्या राऊंडमध्ये सध्याचा जागतिक चॅम्पियन आणि आयबा जागतिक क्रमवारीतील अव्वल बॉक्सर बखोदिर जलोलोवने एकतर्फी विजय मिळवत सतीशला पराभूत केले आहे. सर्व परीक्षकांनी जलोलोवला १०, तर सतीशला ९ गुण दिले आहेत.
त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्येही सतीश पराभूत झाला. त्याला या राऊंडमध्ये ५-०ने पराभवाचा सामना करावा लागला. या राऊंडमध्येही परीक्षकांनी जलोलोवला १०, तर सतीशला ९ गुण दिले. (Boxer Satish Kumar loses to Uzbekistan’s Bakhodir Jalolov in men’s Super Heavy (+91kg) quarterfinals)
https://twitter.com/BFI_official/status/1421688777030864896
यापूर्वी दोघांमध्ये दोन वेळा आमने- सामने आले होते. या दोन्ही वेळी उझबेकिस्तानच्या जलोलोवनेच विजय मिळवला होता. जलोलोवने टोकियो २०२० मध्ये राऊंड १६ चा सामना स्पिलिट डिसिझनच्या आधारे महम्मद अब्दुल्लायेवला पराभूत करून जिंकला होता.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-दोन वेळची पदक विजेती सीमा पुनियाने केला ६०.५७ मीटरचा डिस्कस थ्रो; मिळवला ‘हा’ क्रमांक