क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे एका किशोरवयीन मुलाचे दुर्दैवी निधन झाले आहे. खरं तर, हे सर्व क्रिकेट खेळताना घडल्याची माहिती आहे. क्रिकेट खेळताना मुलगा धाव घेण्यासाठी वेगाने धावला आणि याचदरम्यान तो अचानक जमिनीवर कोसळला. काही समजण्याच्या आतच, त्या मुलाचे जागीच निधन झाले. 16 वर्षीय मुलाचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती आहे. या बातमीने क्रिकेटविश्व हादरले आहे.
दहावीत शिकणाऱ्या मुलाचे क्रिकेट खेळताना निधन
बिल्हौर शहरातील त्रिवेणीगंज मार्केटमध्ये राहणारा अमित कुमार पांडे एका खाजगी कंपनीत काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले असून त्यांचे नाव अनुज आणि हर्षित असे आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अनुज आणि हर्षित यांच्यातील मोठा मुलगा 16 वर्षीय अनुज (Anuj) दहावीत शिकत होता. तो बुधवारी (दि. 07 डिसेंबर) दुपारी आंतरशालेय मैदानावर आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. सर्वकाही व्यवस्थित सुरू होते, सर्व मित्रमंडळी क्रिकेट खेळत होते. याचदरम्यान खेळताना अनुज धाव घेण्यासाठी धावला आणि पडला. पडल्यानंतर तो बेशुद्ध झाला.
डॉक्टरांनी तपासणीनंतर केले मृत घोषित
हाती आलेल्या माहितीनुसार, त्याचे मित्र तातडीने त्याच्या जवळ पोहोचले. अनुजसोबत क्रिकेट खेळत असलेल्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनुज उठतच नव्हता. त्यावेळी त्यातील त्याच्या एका मित्राने घरी जाऊन कुटुंबीयांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचत कुटुंबातील लोकांनी त्याला घाईघाईत सीएससी घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि त्याला मृत घोषित केले.
असे झाले निधन
त्या मुलाच्या निधनामुळे कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबाने एकच हंबरडा फोडला. तसेच, अनुजच्या निधनानंतर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झालीये. लोक म्हणतायेत की, त्याचे निधन धावताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सर्वत्र याच गोष्टींची चर्चा सुरू आहे. (boy ran to take runs while playing cricket and died due to heart attack)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माने दुखापतीविषयी स्वतः दिली माहिती, बांगलादेश दौऱ्यातून घेऊ शकतो माघार?
ICC Ranking | कसोटीत लाबुशेन टॉपवर, वनडेत श्रेयस अय्यर आणि केएल राहुलला फायदा