आशिया चषक 2023 स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामना कोणता असेल, तर तो म्हणजे, भारत विरुद्ध पाकिस्तान होय. हा सामना येत्या 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यावर सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. अशात या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग याने मोठे विधान केले आहे. त्याला विश्वास आहे की, शाहीन शाह आफ्रिदी या सामन्यात उजवा ठरू शकतो. हॉगनुसार, शाहीन आफ्रिदीने विराट कोहली याला लवकर तंबूत पाठवले, तर भारतीय संघावर दबाव येऊ शकतो.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील तिसरा सामना 2 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे खेळला जाणार आहे. भारताचा आशिया चषकातील हा पहिलाच सामना असेल, त्यामुळे संघ स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, पाकिस्तान संघाने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात नेपाळला पराभूत करत शानदार सुरुवात केली. अशात पाकिस्तान संघ भारतीय संघाच्या तुलनेत खूपच मजबूत दिसत आहे.
‘शाहीन आफ्रिदीचे षटक ठरेल महत्त्वाचे’
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रॅड हॉग (Brad Hogg) याच्या मते, शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याचे षटक या सामन्याची दिशा बदलू शकते. त्याने एका शोमध्ये बोलताना म्हटले, “मला वाटते, की शाहीन शाह आफ्रिदीकडे नवीन चेंडूने विकेट घेण्याची संधी असेल. कारण, त्याचा नवीन चेंडू उजव्या हाताच्या फलदाजांपुढे आतल्या बाजूने येतो. पाकिस्तानने विराट कोहलीला नवीन चेंडूवर शाहीन आफ्रिदीकडून लवकर बाद केले, तर भारतीय संघ दबावात येईल. भारताचे अव्वल 3 फलंदाजांपुढे शाहीन आफ्रिदीचे षटक खूपच महत्त्वाचे असेल. माझ्यासाठी या सामन्याचा निकाल येथेच ठरेल.”
खरं तर, विराट कोहली (Virat Kohli) याने मागील वेळी 2022च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानचा सामना केला होता. त्याने पुन्हा जबरदस्त खेळी साकारत आपल्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे भारतीय संघ त्याच्यावर खूपच अवलंबून असेल, असे बोलले जात आहे. (brad hogg on india vs pakistan match result will depend on shaheen shah afridi new ball spell asia cup 2023)
हेही वाचाच-
‘हो’ म्हणली रे! मिलरने किस करत गर्लफ्रेंडला केले Propose, शुबमन-हार्दिकच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष
सीपीएलमध्ये गप्टिलचा झंझावात! षटकारांची बरसात करत ठोकले शतक