यंदाच्या टी20 विश्वचषकातून बांग्लादेशविरुद्ध अफगाणिस्तानच्या विजयाने ऑस्ट्रेलिया बाहेर पडली. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती झाहीर केली आहे. मात्र, तो आयपीएलसह इतर लीगमध्ये खेळत राहणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 49 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. मात्र आता या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
डेव्हिड वॉर्नरने 2009 मध्ये आपल्या टी20 आणि वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरला दक्षिण आफ्रिके विरुद्ध सुरुवात केली होती. तर 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. यानंतर, त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणे सुरूच ठेवले. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2016 जिंकले. सनरायझर्स हैदराबाद व्यतिरिक्त, तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे.
– 18995 runs.
– 42.39 Average.
– 49 Hundreds.
– 2 ODI World Cups.
– 1 T20I World Cup.
– 1 WTC.Phenomenal 15 years of International cricket by David Warner 🚀 pic.twitter.com/88HpdI1oFX
— Johns. (@CricCrazyJohns) June 25, 2024
डेव्हिड वॉर्नरची कामगिरी
18995 धावा
42.39 सरासरी
49 शतके
2 एकदिवसीय विश्वचषक.
1 टी20 विश्वचषक
1 टेस्ट चॅम्पियनशीप
डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये 112 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 8786 धावा केल्या आहेत. तर वॉर्नरने 161 एकदिवसीय सामने खेळला असून ज्यामध्ये 6932 धावा केल्या आहेत. तर टी20 मध्ये 110 सामन्यात 3277 धावा केल्या आहेत. तर डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी फलंदाजापेकी एक खेळाडू आहे. त्याने आयपीएल मध्ये 184 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 6565 धावा केल्या आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
राशीद खाननं दिलेला शब्द सार्थ करुन दाखवलं, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी ठरली खरी
अक्षर पटेलला मिळालं सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचं पदक, अशक्य झेल झेलून दिली होती सामन्याला कलाटणी
अफगाणिस्तानचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातून पत्ता कट!