भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याच्यावर मोठा हल्ला झाला आहे. सुदैवाने शॉला या हल्ल्यात कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित आहे. मित्राच्या गाडीत बसलेल्या शॉकडे काही चाहते सेल्फी घेण्यासाठी आले होते. शॉने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास नकार दिल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. दरम्यान, या प्रकणानंतर पोलिसांनी 8 जणांविरोधात कारवाई केली आहे.
भारताचा हा सलामीवीर फलंदाज सध्या संघातून बाहेर आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आपल्या मित्राच्या गाडीत बसला होता. तितक्यात काहीजण गाडीजवळ आले आणि त्यांनी भारतीय संघाच्या या फलंदाजासोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. शॉच्या या चाहत्यांनी अनेकदा त्याला सेल्फीसाठी विचारले, मात्र त्याने होकार दिला नाही. शॉने जेव्हा या चाहत्यांना दुसऱ्यांदा नकार दिला, तेव्हा काहीजण संतापले आणि त्यांनी गाडीवर दगडफेक केली. शॉच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी 8 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
अभिनेत्रीसोबतच्या फोटोमुळे आधीच आलेला चर्चेत
दरम्यान, पृथ्वी शॉ मागच्या काही दिवसांमध्ये सतत चर्चेत राहिला आहे. भारतीय फलंदाज त्याच्या प्ररदर्शनामुळे चर्चेत येण्याऐवजी दुसऱ्याच काही कारणांमुळे चर्चेत आहे. 14 फेब्रुवारी म्हणजेच वॅलेंटाईन डे दिवशी शॉने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून अभिनेत्री निधी तपाडियासोबतचा त्याचा एक फोटो शेअर केल्याचे समोर आले होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये शॉने निधीचा पत्नी म्हणून उल्लेख केल्याचेही दिसत होते. पण या बातम्या चुकीच्या असल्याचे नंतर स्वतः शॉनेच स्पष्ट केले. “कोणीतरी माझे फोटो एडिट करत आहे”, असे शॉने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले. अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नका, असेही यावेळी तो म्हणाला. असे असले तरी, शॉ आणि निधी मागच्या मोठ्या काळापासून एकमेकांना डेट करत असल्याचेही सांगितले जाते.
शॉच्या कारकिर्दीची विचार केला, तर त्याने भारतासाठी आतापर्यंत 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे 339, 189 आणि शुन्य अशा धावांची नोंद आहे. (breaking Prithvi Shaw’s behavior shocked the fan who asked for a selfie! Stones were thrown at the car)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटीत डेविड वॉर्नर खेळणार की नाही? कर्णधार पॅट कमिन्सने दिले उत्तर
दिल्लीत बदलले टीम इंडियाचे हॉटेल! ‘या’ कारणाने बोर्डाला घ्यावा लागला निर्णय