---Advertisement---

बिग ब्रेकिंग ! अखेर हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट, हार्दिकने स्वतः दिली माहिती

On: गुरूवार, जुलै 18, 2024 9:27 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांचा घटस्फोट झाला आहे. स्वतः हार्दिकने याबाबत सोशल मीडिया पोस्ट करून माहिती दिली आहे.

मागील काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा हे वेगळे होणार याची जोरदार चर्चा होत होती. अखेर यावर आज शिक्कामोर्तब झाले. ४ वर्षे सोबत झाल्यानंतर आम्ही वेगळे होत असल्याचे हार्दिकने म्हटले आहे.

 

हार्दिकनं त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहलं की, “4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि नताशाने पूर्णपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्रितपणे आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आणि आमचे सर्वोत्तम दिले आणि आम्हाला विश्वास आहे की हा निर्णय आमच्या दोघांसाठी योग्य आहे. आमच्यासाठी हा एक कठीण निर्णय होता, कारण आम्हाला एकत्र राहण्याचा आनंद, परस्पर आदर आणि सहवास लाभला आणि आम्ही एका कुटुंबाप्रमाणे पुढे गेलो.”

हार्दिक पांड्यानं नताशा स्टॅनकोविचपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी संध्याकाळी, पांड्यानं त्याच्या इंस्टाग्रामवर एक अधिकृत विधान जारी केले की ते आता एकत्र नाहीत. पोस्टद्वारे त्यानं स्पष्ट केलं की ते त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाचे, अगस्त्यचे पालनं दोघंही करतील.

महत्त्वाच्या बातम्या-

याला दुर्दैव असेच म्हणावे का? टी20मध्ये जबरदस्त कामगिरी, तरीही दिग्गज खेळाडूचा श्रीलंका दौऱ्यातून वगळले
अखेर न्याय मिळाला! कारण नसतानाही वगळलेल्या भारतीय दिग्गजाचे टीम इंडियात कमबॅक
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर…!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---