कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये आयपीएल देखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान होणारा २०२०चा टी२० विश्वचषकही लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
अशामध्ये न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलमने (Brendon McCullum) आयपीएल आणि टी२० विश्वचषकाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्याने म्हटले की, पुरुषांचा टी२० विश्वचषक (Mens T20 World Cup) पुढील वर्षापर्यंत स्थगित केला पाहिजे आणि त्याजागी आयपीएलचे आयोजन केले पाहिजे.
स्काय क्रिकेट पॉडकास्टदरम्यान मॅक्यूलम म्हणाला की, “मला असे वाटते की आयपीएलचे आयोजन ऑक्टोबर महिन्यात केले जावे आणि टी२० विश्वचषक पुढे ढकलण्यात यावा. यामुळे असे होईल की, महिला वनडे विश्वचषक (Womens ODI World Cup) पुढे ढकलण्यात येईल. परंतु यामुळे आपल्याला तिन्ही स्पर्धांचे आयोजन होताना पहायला मिळेल.”
मॅक्यूलम पुढे म्हणाला की, “टी२० विश्वचषक (T20 World Cup) प्रेक्षकांविना खेळवण्यात येईल, असे मला वाटत नाही. कोविड-१९ या व्हायरसमुळे प्रवासावर असलेल्या बंदीने १६ देशांच्या संघांना ऑस्ट्रेलियाचा दौरा करता येणार नाही. जर आयपीएल २०२०चे (IPL 2020) आयोजन झाले नाही तर कोणत्याच सहभागी खेळाडू आणि अधिकाऱ्याला मानधन दिले जाणार नाही.”
आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीची आज (२३ एप्रिल) कॉन्फरन्सद्वारे कोविड-१९मुळे होणाऱ्या परिणामांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच आयसीसीच्या सर्व क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावरही चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये टी२० विश्वचषकाचा समावेश आहे.
मॅक्यूलमने आपल्या आयपीएलच्या कारकीर्दीत एकूण १०९ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने २७.६९ च्या सरासरीने २८८० धावा केल्या आहेत. त्यात २ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-षटकार- चौकार मारले म्हणून एमएस धोनी झाला होता नाराज
-भारतीय खेळाडू देशासाठी नाही तर स्वत: साठी खेळतात
-टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा