सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेचा तिसरा सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. गुरुवारी (6 जुलै) सुरू झालेल्या या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजी विभागाकडून उत्कृष्ट प्रदर्शन केले गेले. दरम्यान, अशी बातमी समोर येत आहे की, इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम याला हेडिंग्ले स्टेडियमवर प्रेवश मिळवण्यासाठी अडचणीचा समना करावा लागला.
लीड्स शहरातील हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवसी हा प्रकार घडला. हेडिंग्ले कसोटीला सुरूवात होण्याआधी स्टेडियमच्या एका सुरक्षारक्षकाकडून ब्रँडन मॅक्युलम (Brendon McCullum) याला अडवले गेले. या सुरक्षारक्षणकाने थेट इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकाला स्टेडियममध्ये जाण्यापासून रोखल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण मॅक्युलमची ओळख पटत नसल्यामुळे सुरक्षारक्षकाला असे करावे लागले. तसेच मॅक्युलमकडेही त्याला दाखवण्यासाठी स्टेडियमचा पास नव्हता. अशात मॅक्युलम त्यावेळी चांगालच अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले. द टाइम्स यूकेने याविषयी सविस्तर वृत्त दिले आहे.
माहितीनुसार सुरक्षारक्षक ब्रँडन मॅक्युलमला ओळखू शकला नाही. मॅक्युलमसाठी देखील हा प्रकार आश्चर्यचकीत करणारा ठरला. अशात मुख्य प्रशिक्षकाचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. माहितीनुसार स्टेडियममध्ये प्रवेश मिळाल्यानंतर जाता मॅक्युलन त्या सुरक्षारक्षकाला असेही म्हटला की, “तुम्हाला आता येणाऱ्या परिस्थिला सामोरं जावं लागणार आहे.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या दुसऱ्या डावात 4 बाद 116 धावा केल्या. तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 26 धावांच्या आघाडीवर होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 60.4 षटकांमध्ये 263 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डावत 237 धावांवर गुंडाळला गेला. हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडसाठी मार्क वुड याने 5, तर ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्स याने 6 विकेट्स घेतल्या. (Brendon McCullum was denied entry into the stadium by Headingley Stadium security guards)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकापूर्वी OYO कंपनीने उचलले मोठे पाऊल, 10 शहरांमध्ये वाढवणार तब्बल ‘एवढे’ हॉटेल्स
अखेर टीम इंडियाच्या ‘त्या’ मालिकेला मिळाला मुहूर्त! जय शहांनीच सांगितली तारीख