भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघानी एक-एक विजय मिळवला आहे. तिसरा आणि निर्णायक सामना बुधवारी (22 मार्च) खेळला जाणार आहे. उभय संघांतील हा तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळला जाण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट ली याने भारतीय संघाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.
नुकत्याच खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत (BGT 2023) भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 असा विजय मिळवला. या कोसटी मालिकेदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचणारे दोन्ही संघ देखील ठरले. आधी ऑस्ट्रेलिया आणि त्यापाठोपाट भारताने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी आपले स्थान पक्के केले. ऑस्ट्रेलियचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) याने डब्ल्यूटीसीच्या विजेतेपदसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या संघाचे नाव देखील सांगितेल.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ब्रेट ली याला वनडे विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा कोण जिंकेल? असा प्रश्न विचारला गेला. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना जून महिन्यात खेळला जाणार आहे, जो ऑस्ट्रेलियन संघ जिंकेल, असे ब्रेट लीला वाटते. तो हसत म्हणाला, “ऑस्ट्रेलिया जिंकेल. भारत एक चांगला संघ आहे, पण सामना इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियवर आहे. मला वाटते तिथल्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला अधिक धावा मिळतील. म्हणून मी ऑस्ट्रेलियावर दावा करतो.”
यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकात भारतीय संघ जयमानपद भूषवणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला मायदेसातील परिस्थितीचा फायदा विश्वचषक जिंकण्यासाठी होईल, असे ब्रेट लीला वाटते. तो म्हणाला, “भारतात होणाऱ्या विश्वचषकात भारताला पराभूत करणे कठीण आहे. भारताला याठिकाणची परिस्थितीत सर्वात चांगली माहिती आहे. मला वाटते भारत विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार आहे.” दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दुसरीकडे आयसीसी वनडे विश्वचषक 2023 यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये आयोजित केला गेला आहे.
(Brett Lee Says Team India’s Future, find out Who Will Win WTC Final and ODI World Cup )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
निंदनीय! महाराष्ट्राच्या पैलवानाकडून इराणी पैलवानाला चालू कुस्तीत मारहाण, सांगलीत घडली घटना
WPL 2023: मुंबईचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत दिल्ली अव्वलस्थानी, कॅप्सीने पाडला षटकारांचा पाऊस